धक्कादायक : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी तब्बल १७ विद्यार्थ्यांनी बदलला धर्म

प्रशिक्षण संचालनालयाने UP NEET समुपदेशनाच्या पहिल्या टप्प्यातील 8 उमेदवारांचे प्रवेश रद्द केले आहेत.

धक्कादायक :  वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी तब्बल १७ विद्यार्थ्यांनी बदलला धर्म

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुजा खेडकर प्रकरण (Pooja Khedkar case) ताजे असताना आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तब्बल 17 विद्यार्थ्यांनी बनावट धर्मांतर (As many as 17 students fake conversion to get admission in medical college) केल्याची घटना उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) येथून समोर आली आहे. 

अल्पसंख्याक कोट्यातून (Minority Quota) एमबीबीएसच्या जागा मिळवण्यासाठी १७ विद्यार्थ्यांनी फसवणुकीचा मार्ग अवलंबला, त्यानंतर तपासात हा प्रकार उघडकीस आला. बनावट प्रमाणपत्रे (Fake certificates) सादर केल्यामुळे उत्तर प्रदेशच्या वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाने UP NEET समुपदेशनाच्या पहिल्या टप्प्यातील 8 उमेदवारांचे प्रवेश रद्द केले आहेत. अल्पसंख्याक कोट्यातील जागांसाठी सुभारती मेडिकल कॉलेजमध्ये ही फसवणूक झाली आहे.

सुभारती वैद्यकीय महाविद्यालय हे खाजगी वैद्यकीय महाविद्यालय असून ते बौद्ध अल्पसंख्याक संस्थेच्या अंतर्गत येते. समुपदेशनाच्या पहिल्या टप्प्यात अल्पसंख्याक कोट्यासाठी २२ जागा देण्यात आल्या होत्या, त्यावर १७ विद्यार्थ्यांनी बनावट प्रमाणपत्रे तयार करून एमबीबीएसच्या जागा मिळवल्या होत्या. त्यावर आता वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने कारवाई केली आहे. तपासानंतर 8 विद्यार्थ्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे बनावट प्रमाणपत्राची तक्रार आली होती, त्यानंतर हा मोठा घोटाळा उघडकीस आला. तपासात यूपीच्या सर्व अल्पसंख्याक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली.