बार्टी, सारथी, महाज्योतीच्या सीईटी परीक्षांवर अतिवृष्टीमुळे विघ्न, तारीख बदलणार का?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) धर्तीवर राज्यात छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थांकडून एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, रेल्वे व इतर स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाते. खासगी संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

एज्युवार्त न्यूज नेटवर्क
राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (Maharashtra Public Service Commission Exam) विनंती करून २८ सप्टेंबरला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यानुसार एमपीएससीने २८ सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली असून ती आता नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. मात्र एमपीएससीने इतका महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असला तरी राज्यातील बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांनी (Barty, Sarathi, Mahajyoti, TRTI Institute) मात्र अद्यापही त्यांच्या यूपीएससी आणि अन्न परीक्षांच्या प्रशिक्षणासाठी घेतली जाणारी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) पुढे ढकललेल्या नाहीत. राज्याच्या विविध भागात पावसाने थैमान घातले असल्याने या संस्थांनी तात्काळ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
विद्यार्थ्यांनी संविधानातील नीतिमूल्यांचा आदर्श विचार पुढे न्यावा; सरन्यायाधीश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) धर्तीवर राज्यात छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थांकडून एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, रेल्वे व इतर स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाते. खासगी संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
सामायिक प्रवेश परीक्षांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून त्या त्या संस्थानुसार घेण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुसार सामायिक प्रवेश परीक्षा २९ आणि ३० सप्टेंबर रोजी होणार आहे. अद्यापही अनेक भागातील पूर परिस्थिती सावरलेली नाही. तर राज्याच्या विविध भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. हीच बाब लक्षात घेऊन एमपीएससीने त्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत असे असतानाही बार्टी, सारथी आणि महाज्योतीकडून अद्यापही परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे काही तासांवर आलेल्या या परीक्षा वेळेवर होणार की, सीईटी आपल्या वेळापत्रकात बदल करणार हे पाहावे लागणार आहे.