शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीच्या खानापूरातच, १४१ कोटींच्या निधीची घोषणा.. 

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे सुरू करण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केली. उपकेंद्र उभारणीसाठी 141 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची घोषणाही मंत्री पाटील यांनी केली.

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीच्या खानापूरातच, १४१ कोटींच्या निधीची घोषणा.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठाचे (Shivaji University Kolhapur) उपकेंद्र सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे सुरू (Khanapur Sub-centre to be opened) करण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांनी विधानसभेत केली. उपकेंद्र उभारणीसाठी 141 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची घोषणाही मंत्री पाटील यांनी केली. याबाबत आमदार सुहास बाबर (MLA Suhas Babar) यांनी 'पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन'द्वारे मागणी केली होती. आमदार गोपीचंद पडळकर यांनीही ही मागणी आग्रहीपणे लावून धरली, त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी खानापूर उपकेंद्राची घोषणा केली. 

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार बाबर आणि आमदार पडळकर यांनी पॉईंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा मुद्दा मांडला. त्यावर आमदार बाबर आणि आमदार पडळकर यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आग्रह करत उपकेंद्र खानापूर येथेच व्हावे, अशी मागणी लावून धरली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे सुरू येणार असल्याची घोषणा केली. 
__________________________________

शिवाजी विद्यापीठाचे सांगली येथे उपपरिसर प्रस्थापित करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील विविध घटकांकडून प्राप्त झालेल्या निवेदनास अनुसरून विद्यापीठाने या मागणीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली होती. या समितीने सर्व बाबींचा अभ्यास करून आपला अहवाल विद्यापीठास सादर केला. त्या अहवालानुसार विद्यापीठाने शासनास प्रस्ताव सादर केला त्यास मंजूरी देण्यात आली आहे. खानापूर उपकेंद्र सुरू करण्यासाठी १४१ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. 

चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री 
___________________________________

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे करण्यास मंजूरी मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. विधानसभेमध्ये उपकेंद्राच्या विचारलेल्या प्रश्नावर उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्याची आणि १४१ कोटींचा निधी मंजूर करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.

सुहास बाबर, आमदार (खानापूर)