SPPU PHD प्रवेशाची दुसरी फेरी जूनच्या पहिल्या आठवड्यात? 

विद्यापीठाच्या संशोधन केंद्रामधील मार्गदर्शकांकडे (पीएचडी गाईड) उपलब्ध असणाऱ्या जागांचा आढावा घेतला जात असून त्यानुसार दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या जागा प्रसिद्ध करून पीएचडी प्रवेशाची दुसरी फेरी राबवली जाणार आहे.

SPPU PHD प्रवेशाची दुसरी फेरी जूनच्या पहिल्या आठवड्यात? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University)यांच्या विभागांतर्गत आणि संलग्न महाविद्यालयामधील संशोधन केंद्रात पीएचडीसाठी प्रवेश (Admission for PhD in Research Center)घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच दुसरी प्रवेश फेरी राबवली जाणार आहे. त्यामुळे पीएचडी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात PHD प्रवेशाची दुसरी फेरी (Second round of PHD admission)राबविली जाणार असल्याचे विद्यापीठातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

पुणे विद्यापीठातील विविध विभागातील पीएचडी प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. विद्यापीठ PHD प्रवेशासाठी राबविली जात असलेले पहिली प्रवेश फेरी संपुष्टात आली असून विद्यापीठातर्फे प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची तयारी केली जात आहे. विद्यापीठाच्या संशोधन केंद्रामधील मार्गदर्शकांकडे (पीएचडी गाईड) उपलब्ध असणाऱ्या जागांचा आढावा घेतला जात असून त्यानुसार दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या जागा प्रसिद्ध करून पीएचडी प्रवेशाची दुसरी फेरी राबवली जाणार आहे.

निकाल लागले; कॉलेज केव्हा सुरू होणार? कोविडनंतर प्रथमच शैक्षणिक सत्र वेळेत

दरम्यान, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयामध्ये ज्या ठिकाणी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आहे. अशाच महाविद्यालयातील प्राध्यापकांना पीएचडी गाईड म्हणून मान्यता देऊन विद्यापीठाकडून 'पीएचडी'साठी विद्यार्थी दिले जात आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयानुसार विद्यापीठ प्रशासनाने याबाबतची नियमावली तयार केली आहे.मात्र, त्यामुळे विद्यार्थी व मार्गदर्शक या दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या नियमावलीत बदल करावा, अशी मागणी विद्यार्थी व प्राध्यापक संघटनांकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुद्धा विद्यापीठ अनुदान आयोगाला या संदर्भातील चार स्मरणपत्रे पाठविले आहेत. परंतु, अद्याप युजीसीने त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. लवकरच विद्यापीठातील अधिकारी यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन नियमावलीत बदल करण्यासंदर्भात विनंती करणार आहेत.