निकाल लागले; कॉलेज केव्हा सुरू होणार? कोविडनंतर प्रथमच शैक्षणिक सत्र वेळेत

निकाल लागले; कॉलेज केव्हा सुरू होणार? कोविडनंतर प्रथमच शैक्षणिक सत्र वेळेत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कोरोनामुळे देशभरातील विद्यापीठांचे शैक्षणिक कॅलेंडर (Academic calendar)कोलमडले होते. प्रवेश प्रक्रियेपासून परीक्षा घेणे व निकाल जाहीर करणे यात काही महिन्यांची तफावत दिसून येत होती.मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) यंदा बहुतांश विषयांच्या परीक्षांचे निकाल नियोजित वेळेत जाहीर केले असून उर्वरित निकाल जून महिन्यात (Results in the month of June)जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे 2025-26 या शैक्षणिक वर्षाचे विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र नियोजित कालावाधीत सुरू होणार आहे.त्यामुळे कॉलेज वेळेत सुरू (College starts in time)होणार आहेत. 

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे ,अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अनेक परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. तसेच इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकालही यंदा लवकर जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे. त्याचाप्रमाणे विद्यापीठाने सुध्दा शैक्षणिक सत्र सुरू करण्याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. येत्या 16 जूनपासून बी.ए.,बी. कॉम., बी.एस्सी. आदी पारंपरिक अभ्यासक्रमाचे शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. तसेच येत्या 1 जुलैपासून अभियांत्रिकीसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे द्वितीय वर्षांचे शैक्षणिक सत्र सुरू केले जाणार आहे. 

दरम्यान, सीईटी सेलतर्फे घेण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या फेऱ्या जशा पूर्ण होतील. त्यानुसार विद्यापीठातर्फे या अभ्यासक्रमाचे सत्र केव्हा सुरू होईल, याबाबतची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थी नियोजित वेळेत महाविद्यालय प्रवेश घेतील,अशी शक्यता निर्माण झाली आहे.