11th Admission: ईन-हाऊस कोट्याबाबत शिक्षण संचालनालयाचा मोठा निर्णय

मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे येथे उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय / वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळा करीता एक युनिट ग्राह्य धरणे योग्य राहील.

11th Admission: ईन-हाऊस कोट्याबाबत शिक्षण संचालनालयाचा मोठा निर्णय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

शालेय शिक्षण विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात यंदापासून (२०२५-२६) उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता ११ वी प्रवेश केंद्रिय ऑनलाईन प्रक्रियेद्वारे (11thAdmission Process) करण्यात येत आहेत. परंतु, शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) (Directorate of Education (Secondary and Higher Secondary)) इयत्ता ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान आलेल्या अडचणींच्या अनुषंगाने ईन-हाऊस कोट्याबाबत काही महत्वाचे बदल (Changes regarding in-house quota) केले आहेत.

त्यानुसार, इन-हाऊस कोट्याअंतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित असणार आहे. त्याबरोबरच मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे येथे उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय / वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळा करीता एक युनिट ग्राह्य धरणे योग्य राहील. आणि राज्यातील उर्वरीत जिल्ह्यांसाठी त्याच संस्थेची शाळा व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय / वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसूली जिल्ह्यामध्ये एक युनिट इन-हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरणे योग्य राहील असे शिक्षण विभागामार्फत सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी-पालक व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय / वरिष्ठ महाविद्यालय यांना येणा-या अडचणी व संभ्रम लक्षात घेता हा बदल करण्यात आला आहे. याबाबत संबंधितांनी आपल्या स्तरावरुन आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात असे परिपत्रकाद्वारे कक्ष अधिकारी मृणाली काटेंगे यांनी सांगितले आहे.