SPPU : संरक्षण व सामरिकशास्त्र विभागातर्फे 'फ्यूचर वॉर अँड वॉरफेअर' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

जनरल अनिल चौहान हे 'फ्यूचर वॉर अँड वॉरफेअर' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

SPPU : संरक्षण व सामरिकशास्त्र विभागातर्फे 'फ्यूचर वॉर अँड वॉरफेअर' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) संरक्षण व सामरिकशास्त्र विभागातर्फे (Department of Defense and Strategic Studies) येत्या 3 जून रोजी दुपारी 1.30 वाजता भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सिडीएस) जनरल अनिल चौहान (Indian Army Chief of Defence Staff (CDS) General Anil Chauhan) यांचे व्याख्यान (Lecture) आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांनी दिली

जनरल अनिल चौहान हे 'फ्यूचर वॉर अँड वॉरफेअर' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. विद्यापीठातील इरावती कर्वे संकुलातील सभागृहात हे व्याख्यान होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी असणार आहेत.

याबरोबरच विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पराग काळकर, प्रभारी कुलसचिव सीएमए चारुशीला गायके यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमात विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्यापरिषद सदस्य, अधिसभा सदस्य, शैक्षणिक व प्रशासकिय विभागांचे प्रमुखही उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, या व्याख्यानासाठी उपस्थित राहण्याचे आवाहनही विभागप्रमुख प्रा. डॉ. विजय खरे यांनी केले आहे.