UPSC परीक्षेत ६ नाही, फक्त ३ प्रयत्न, ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यवसायिकांना संधी; माजी आरबीआय गव्हरनरांची सूचना
माजी आरबीआय गव्हर्नर यांनी केवळ वय आणि प्रयत्न मर्यादा कमी करण्याबद्दलच बोलले नाही तर ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अनुभवी व्यावसायिकांसाठी खास एंट्री परीक्षा सुरू करण्याची सूचना देखील केली आहे. सुब्बाराव यांच्या या सूचनांवर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूने प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
देशातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेबाबत (UPSC Civil Services Exam) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (Reserve Bank of India) (आरबीआय) माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी काही बदल सुचवत (Former Governor D. Subbarao has suggested some changes) एका नवीन वादाला सुरुवात केली आहे.
माजी आरबीआय गव्हर्नर यांनी केवळ वय आणि प्रयत्न मर्यादा कमी करण्याबद्दलच बोलले नाही तर ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अनुभवी व्यावसायिकांसाठी खास एंट्री परीक्षा सुरू करण्याची सूचना देखील केली आहे. सुब्बाराव यांच्या या सूचनांवर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूने प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
सुब्बाराव यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले आहे की, 'सध्या उमेदवार २१ ते ३२ वयोगटातील सहा प्रयत्न करू शकतात, ज्यामुळे बरेच तरुण या तयारीत त्यांचे सर्वात महत्वाची वर्ष गमावतात. वारंवार अपयशी ठरल्यानंतर अनेक उमेदवारांवर असलेल्या मानसिक ओझ्याकडे सुब्बाराव यांनी लक्ष वेधले. त्यांनी असा युक्तिवाद केला की तरुण उमेदवार दोन किंवा तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर स्वेच्छेने माघार घेतील अशी अपेक्षा करणे अवास्तव आहे.
माजी गव्हर्नरांनी असेही म्हटले की 'अनेक उमेदवार 'संक कॉस्ट फॉलसी' म्हणजेच "मी आतापर्यंत खूप गुंतवणूक केली आहे, आता मी कसे सोडू शकतो?" या मानसिकतेला बळी पडतात. वारंवार अपयशी ठरल्यानंतरही ते प्रयत्न करत राहतात, ज्यामुळे त्यांचा वेळ वाया जातोच शिवाय मानसिक ताणही वाढतो. १९७० च्या दशकात UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी फक्त २ प्रयत्न होते आणि २१-२४ वर्षे वयोमर्यादा होती, हे योग्य होते.
सुब्बाराव यांनी ४० वर्षांवरील लोकांसाठी भारतीय प्रशासकीय सेवेत एक नवीन 'टियर-२ प्रवेश' प्रणाली सुरू करण्याचा सल्ला दिला, जी ४०-४२ वर्षांच्या अनुभवी व्यावसायिकांसाठी दरवर्षी आयोजित केली जावी. ही केवळ तात्पुरती पार्श्विक प्रवेश नसून कायमस्वरूपी, स्पर्धात्मक भरती मार्ग असावा. या बदलामुळे प्रशासनात बाह्य दृष्टीकोन, अनुभव आणि सहानुभूती ही मूल्ये देखील सामील होतील.