विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी खेळ हाच 'एमपीएससी'चा नवा कार्यधर्म झालाय..
एमपीएससी लिपिक टंकलेखन २०२३ भरतीला दोन वर्षाहून अधिक काळ लोटूनही आयोग आजपर्यंत ना तात्पुरती यादी जाहीर करू शकला नाही. त्यामुळे या यादीकडे लक्ष लागून राहिलेले हजारो विद्यार्थी हवालदिल झाले आहेत, असा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
'विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी खेळ करणे' हाच आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (MPSC) नवा कार्यधर्म झालाय. एमपीएससी लिपिक टंकलेखन २०२३ (MPSC Clerk Typing 2023) भरतीला दोन वर्षाहून अधिक काळ लोटूनही (The recruitment process has been going on for two years) आयोग आजपर्यंत ना तात्पुरती यादी जाहीर (Provisional list not announced) करू शकला नाही. त्यामुळे या यादीकडे लक्ष लागून राहिलेले हजारो विद्यार्थी हवालदिल झाले आहेत, असा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केला आहे.
एमपीएससी लिपिक टंकलेखक 2023 भरतीला दोन वर्षांहून अधिक काळ लोटूनही आयोग आजपर्यंत ना तात्पुरती यादी जाहीर करू शकला नाही. हजारो विद्यार्थ्यांनी घरदार सोडून, नोकऱ्यांचे पर्याय टाळून, फक्त या भरतीवर विश्वास ठेवून अभ्यास केला. मात्र, आयोगाच्या संथ, बेफिकीर आणि बेशिस्त कारभारामुळे आज त्याच विद्यार्थ्यांची स्वप्नं चुरगाळली जात आहेत. फक्त उडवा-उडवीची उत्तरं देणं, वेळकाढूपणा करण आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी खेळ करण हाच आज आयोगाचा 'नवा कार्यधर्म' झालाय का?, असा खोचक सवाल तुपकर यांनी केला आहे. त्यांनी 'एक्स' या आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे.
दोन वर्षं होऊन गेली, पण अजूनही यादी नाही, स्पष्टता नाही, जबाबदारी नाही हे बघून संताप अनावर होतोय! आम्ही सरकारलाही थेट सांगतो ही फक्त भरती नाही, हे विद्यार्थ्यांच्या भविष्याचं युद्ध आहे, तात्काळ ही भरती प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरणार नाही, आणि त्या आंदोलनातून होणाऱ्या पूर्ण परिणामाची जबाबदारी आयोग आणि शासनाची असेल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे.