JEE Advanced 2024 चे स्कोअरकार्ड प्रसिद्ध 

आकडेवारीनुसार यावर्षी एकूण 48,248 उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

JEE Advanced 2024 चे स्कोअरकार्ड प्रसिद्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 IIT मद्रास (IIT Madras) यांनी JEE Advanced 2024 चे स्कोअरकार्ड प्रसिध्द केले आहे. परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार हे अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर तपासू शकतात. विशेष म्हणजे  जेईई ॲडव्हान्स परीक्षेच्या उत्तर की  ९ जून रोजी जाहीर झाल्या होत्या. आकडेवारीनुसार यावर्षी एकूण 48,248 उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

जेईई ॲडव्हान्स स्कोअरकार्ड डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि जन्मतारीख द्यावी लागेल. ही परीक्षा 26 मे रोजी सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 2:30 ते 5:30 अशा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. JEE Advanced तात्पुरती उत्तर की 2 जून रोजी प्रसिद्ध झाली. उमेदवार 3 जूनपर्यंत तात्पुरत्या उत्तरपत्रिकेवर आक्षेप नोंदवू शकत होते. JEE Advanced अंतिम उत्तर की ९ जून रोजी प्रसिद्ध झाली.

जेईई ॲडव्हान्स स्कोअरकार्डवर नमूद केलेले तपशील

* नोंदणी क्रमांक
* प्रगत रोल नंबर
* उमेदवाराचे नाव
* जन्मतारीख
* पात्रता स्थिती
* श्रेणीनुसार अखिल भारतीय रँक (AIR)
* पेपर १ आणि २ मधील विषयनिहाय गुण
* एकूण गुण

JEE Advanced Scorecard असे करा डाउनलोड 

* JEE Advanced 2024 jeeadv.ac.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
* JEE Advanced 2024 स्कोअरकार्ड लिंकवर क्लिक करा.
* आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा.
* JEE Advanced 2024 चे स्कोअरकार्ड प्रदर्शित केले जाईल.
* JEE Advanced 2024 स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.