भारतात परदेशी विद्यार्थ्यांना 'या' अभ्यासक्रमाला प्रवेश नाही ; युजीसीचे स्पष्ट निर्देश 

ओपन आणि डिस्टन्स लर्निंग मोडसाठी देशाच्या कोणत्याही भागात राहणारा विद्यार्थी  नोंदणी करू शकतो.

भारतात परदेशी विद्यार्थ्यांना 'या' अभ्यासक्रमाला प्रवेश नाही ; युजीसीचे स्पष्ट निर्देश 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) उच्च शिक्षण संस्थांना आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना (International students)ओपन अँड डिस्टन्स लर्निंग (Open and Distance Learning-ODL) प्रोग्राममध्ये प्रवेश न देण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाने स्पष्ट केले की, नियमांनुसार, केवळ भारतात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येते.

UGC ने ODL प्रोग्राम्स अँड ऑनलाईन प्रोग्रॅम्स रेग्युलेशन 2020 च्या नियमावलीचा संदर्भ दिला आहे. ज्यात असे म्हटले आहे, की “  ओपन आणि डिस्टन्स लर्निंग मोडसाठी देशाच्या कोणत्याही भागात राहणारा विद्यार्थी  नोंदणी करू शकतो. कार्यक्रमात खुल्या आणि दूरस्थ शिक्षण पद्धती अंतर्गत कार्यक्रम ऑफर करण्यासाठी उच्च शैक्षणिक संस्था, प्रवेश, संपर्क कार्यक्रम, परीक्षा आदी सुविधा विद्यार्थ्यांना पुरवण्यास सक्षम असावे. या नियमांचे पालन करणाऱ्या संस्था फक्त भारतात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतात." 
आयोगाने  या संदर्भात गृह मंत्रालयाला ही सूचना दिल्या आहेत.  UGC ने म्हटले आहे  की, "कॅम्पसच्या बाहेर चालणाऱ्या शैक्षणिक संस्था, दूरस्थ शिक्षण कार्यक्रम देणाऱ्या मुक्त विद्यापीठाची अभ्यास केंद्रे, आउटरीच प्रोग्राम चालवणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी परदेशी नागरिकांना विद्यार्थी व्हिसा दिलेला नाही. मात्र, जर एखादी संस्था असे करत असेल तर ते बेकायदेशीर आहे."