पुण्यात २० सप्टेंबर रोजी ‘अभियंता उद्योजक’ कार्यशाळा; आर्टीची अधिकृत माहिती 

या कार्यशाळेच्या माध्यमातून राज्यातील मातंग समजातील अभियंता उद्योजकांना उद्योग, उद्योगातील बारकावे, उद्योग क्षेत्रातील संधी, उद्योगासाठी लागणारे आर्थिक भाग भांडवल कसे उभे करायचे, उद्योग कसे विकसित करायचे, कोणते उद्योग उभारावेत, भविष्यात कोणत्या उद्योगांना बाजारात जास्त किंमत मिळेल, यांसारख्या अनेक गोष्टींचे मार्गदर्शन उद्योग क्षेत्रातील यशस्वी व तज्ञ उद्योजक, शासनाच्या उद्योग विभागातील प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. 

पुण्यात २० सप्टेंबर रोजी ‘अभियंता उद्योजक’ कार्यशाळा; आर्टीची अधिकृत माहिती 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील अभियंता उद्योजकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (Anna Bhau Sathe Research and Training Institute) (आर्टी) पुणेच्या वतीने राज्यातील सर्व मातंग समाजातील अभियंता उद्योजकासाठी कार्यशाळेचे (Engineer Entrepreneur Workshop) आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा  २० सप्टेंबर २०२५ रोजी पुणे येथे (Workshop on 20th September 2025 in Pune) घेण्यात येणार असून, यासाठी राज्यातील जास्तीत-जास्त अभियंता उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे (Sunil Ware, Managing Director of Arti) यांनी केले आहे.

ही कार्यशाळा २० सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सीओईपी अभियांत्रिकी विद्यापीठ, पुणे येथे होणार आहे. या कार्यशाळेत उद्योग क्षेत्रातील यशस्वी व तज्ञ उद्योजक, शासनाच्या उद्योग विभागातील प्रशासकीय अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेतून उद्योजकांना नवीन संधी आणि मार्गदर्शन ही मिळणार असल्याने मातंग समाजातील उद्योजक, अभियंते आणि होतकरू तरुणांनी या कार्यशाळेत आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन वारे यांनी केले आहे.