महाविद्यालयीन विद्यार्थी करतील अवयव दानाविषयी जनजागृती ; UGC चे महाविद्यालयांना पत्र 

 १८ ते ३० वयोगटातील उच्च शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अवयवदानाची कमतरता दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून त्यांच्या घरातील, परिसरातील व परिसरातील लोकांचे गैरसमज दूर करून जनजागृती करता येईल.

महाविद्यालयीन विद्यार्थी करतील अवयव दानाविषयी जनजागृती ; UGC चे महाविद्यालयांना पत्र 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मृत्यू पश्चात अवयव दानाबद्दल (organ donation) अजूनही समाजात बरेच गैरसमज आहेत. यामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागतो.  हे गैरसमज दूर करून समाजात अवयव दानाविषयी जनजागृती करण्याची जबाबदारी आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर (college students) सोपवण्यात आली आहे. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान अयोग्य (UGC) ने सर्व विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांना पत्र लिहिले आहे.

हेही वाचा : शिक्षण विद्यापीठाने सोडले विद्यार्थ्यांना वाऱ्यावर ; विद्यार्थ्यांशी निगडित दोन पदांचा घेतला बळी

देशातील सर्व उच्च शैक्षणिक संस्थांमधील चार कोटी विद्यार्थी अवयवदान जनजागृतीसाठी प्रतिज्ञा घेतील. याविषयीचे प्रतिज्ञा पत्र UGC ने सर्व संस्थांना पाठवले आहे.  १८ ते ३० वयोगटातील उच्च शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अवयवदानाची कमतरता दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून त्यांच्या घरातील, परिसरातील व परिसरातील लोकांचे गैरसमज दूर करून जनजागृती करता येईल. सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना विनंती करण्यात आली आहे की, विद्यार्थ्यांनी अवयवदानाचे प्रतिज्ञापत्र भरून जागृती करावी. या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी आणि सहानुभूतीची भावनाही निर्माण होईल. एखादी व्यक्ती, त्याच्या मृत्यूनंतर, किडनी, यकृत, फुफ्फुसे, हृदय, स्वादुपिंड आणि आतडे दान करून आठ लोकांना नवीन जीवन देऊ शकते. याशिवाय कॉर्निया, त्वचा, हाडे यांसारख्या अवयवांचे  दान केल्याने अनेकांचे आयुष्य सुधारू शकते, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

 अवयवदानाच्या शपथेमुळे तरुणांमध्ये सामाजिक जबाबदारी आणि करुणेची भावनाही जागृत होईल. याशिवाय विद्यार्थ्यांना सेमिनार आणि कार्यशाळेच्या माध्यमातून अवयवदानाच्या नैतिक, वैद्यकीय आणि सामाजिक पैलूंची माहितीही दिली जाणार आहे.  देशातील रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत प्रत्यारोपणासाठी उपलब्ध अवयवांची मोठी कमतरता आहे, परिणामी मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत आहे, असेही  पत्रात नमूद करण्यात आले आहे.