डेटिंग आणि रिलेशनशिप' धड्याविषयी CBSE ने दिले स्पष्टीकरण 

डेटिंग आणि रिलेशनशिप्स" या अध्यायातील आक्षेपार्ह अभ्यास सामग्रीचे CBSE प्रकाशन म्हणून एका समाज माध्यमाद्वारे वर्णन केले जात आहे. हे पूर्णपणे निराधार आणि असत्य आहे.

डेटिंग आणि रिलेशनशिप' धड्याविषयी CBSE ने दिले स्पष्टीकरण 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

काही दिवसांपासून सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ( CBSE )  च्या इयत्ता ९ वी च्या व्हॅल्यू एज्युकेशन अंतर्गत पुस्तकात 'डेटिंग आणि रिलेशनशिप' (Dating and Relationship)या विषयावर धडा शिकवला जात असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्ट वर बोर्डाने स्पष्टीकरण दिले आहे. 

 “डेटिंग आणि रिलेशनशिप्स" या अध्यायातील आक्षेपार्ह अभ्यास सामग्रीचे CBSE प्रकाशन म्हणून एका समाज माध्यमाद्वारे वर्णन केले जात आहे. हे पूर्णपणे निराधार आणि असत्य आहे.” असे स्पष्टीकरण बोर्डाने दिले आहे.

सीबीएसईने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आयहे की,  सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे पुस्तक लेखक गगन दीप कौर यांनी लिहिलेले आहे आणि जी. राम बुक्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारा प्रकाशित केले आहे. ‘ए गाइड टू सेल्फ अवेअरनेस अँड एम्पॉवरमेंट’ या पुस्तकाच्या ‘डेटिंग अँड रिलेशनशिप्स’ या अध्यायात दिलेले अभ्यास साहित्य या खाजगी प्रकाशनाचे आहे.“ सीबीएसई कोणतेही पुस्तक प्रकाशित करत नाही किंवा कोणत्याही खाजगी प्रकाशकाकडून कोणत्याही पुस्तकाची शिफारस करत नाही,” असेही  बोर्डाने म्हटले आहे. 

सोशल मीडियावर त्या धड्याचे चित्र  व्हायरल होत आहे. तसेच या धड्यात  क्रश, घोस्टिंग, कॅटफिशिंग आणि सायबर बुलिंग यासारख्या लोकप्रिय डेटिंग संज्ञा स्पष्ट केल्या जात आहेत, असा दावा करण्यात आला आहे. काहींनी याचे कौतुक करत मंडळाने घेतलेला पुरोगामी दृष्टिकोन असे म्हटले आहे. तर एका डेटिंग ॲप ने यावर टिकात्मक प्रतिक्रिया देताना आता CBSC पुढचा धडा ''ब्रेकअपला कसे सामोरे जावे". या विषयावर शिकवेल असे म्हटले आहे.