मुंबई विभागांतर्गत १७९ 'कनिष्ठ लेखापाल' पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा व कोषागारे मुंबई याविभागांतर्गत 'कनिष्ठ लेखापाल' पदांच्या एकूण १७९ रिक्त जागांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ६ मार्च २०२५ पर्यंत देण्यात आली आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा व कोषागारे मुंबई याविभागांतर्गत (Joint Director, Accounts and Treasury Mumbai Division) 'कनिष्ठ लेखापाल' पदांच्या (Junior Accountant' post) एकूण १७९ रिक्त जागांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू (Application process begins) करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत ६ मार्च २०२५ पर्यंत देण्यात आली आहे. (Application deadline 6 th March)
या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 19 वर्षे पूर्ण केलेले असणे अपेक्षित आहे. तर कमाल वयोमर्यादा ३५ असावी. भरती नियमानुसार ओबीसी उमेदवारांना ३ वर्षे तर मागासवर्गीय आणि इतरांना ५ वर्षाची सूट असणार आहे. यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला 1 हजार तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे.
शैक्षणिक अर्हता -
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादा किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.