बँक ऑफ इंडियामध्ये ४०० पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू 

अप्रेंटिसशिपसाठी निवड प्रक्रिया बँक ऑफ इंडिया आणि NATS च्या नियमांनुसार केली जाईल. यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना बँकेच्या विविध शाखांमध्ये प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात येईल.

बँक ऑफ इंडियामध्ये ४०० पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

बँकिंग क्षेत्रात करिअरची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ इंडिया (BOI) ने अप्रेंटिसशिप भरती 2025  (Apprenticeship Recruitment 2025) संदर्भातील अधिकृत अधिसूचना जाहीर (Notification released) केली आहे. या भरतीअंतर्गत 2025-26 साठी 400 अप्रेंटिस पदांवर उमेदवारांना प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 10 जानेवारी 2026 पर्यंत (Term until January 10, 2026) अर्ज करू शकतात. 

हेही वाचा - शालार्थ आयडी घोटाळा : यवतमाळचे शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांना अटक

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 25 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही भरती देशातील विविध राज्यांमध्ये होणार असून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा निश्चित मासिक वेतन मिळेल. यामध्ये आसाम, बिहार, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, दिल्ली आदी राज्यांचा समावेश आहे. यापैकी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि झारखंड या राज्यांमध्ये सर्वाधिक जागा उपलब्ध आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची पदवी असणे आवश्यक आहे. पदवी पूर्ण करण्याचा कालावधी 1 एप्रिल 2021 ते 1 डिसेंबर 2025 दरम्यानचा असावा. अर्ज शुल्क उमेदवाराच्या प्रवर्गानुसार निश्चित करण्यात आले आहे. तर वयमर्यादा 20 ते 28 दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवाराचा जन्म 2 डिसेंबर 1997 पूर्वीचा आणि 1 डिसेंबर 2005 नंतर नसावा. 

अप्रेंटिसशिपसाठी निवड प्रक्रिया बँक ऑफ इंडिया आणि NATS च्या नियमांनुसार केली जाईल. यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना बँकेच्या विविध शाखांमध्ये प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात येईल.

अर्ज कसा कराल?

सर्वप्रथम www.mhrdnats.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. नवीन नोंदणी करून लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करा.
Bank of India Apprenticeship 2025 हा पर्याय निवडा. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज शुल्क भरून फॉर्म अंतिमतः सबमिट करा.