NCTE ची मोठी कारवाई; देशातील हजारो शिक्षण संस्थांची मान्यता केली रद्द

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (एनईपी) लागू झाल्यानंतर, एनसीटीईने  शिक्षण संस्थांच्या गुणवत्तेची तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे सुमारे तीन हजार संस्था संशयाच्या भोवऱ्यात आल्या आहेत. त्या संस्थांना वारंवार ईमेल करून २०२१-२२ आणि २०२२-२३ चे कामगिरी मूल्यांकन अहवाल (PARs) मागवण्यात आले होते. परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

NCTE ची मोठी कारवाई; देशातील हजारो शिक्षण संस्थांची मान्यता केली रद्द

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सीबीएसईने 'डमी शाळां'ना संलग्नीकरण रद्द करण्यास सुरुवात केली आहे. तर आता  दुसरीकडे, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (National Council for Teacher Education) एनसीटीई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. NCTE ने देशभरातील  २ हजार  २२४ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द केली आहे. (Recognition of 2,224 educational institutions across the country has been cancelled) आणखी काही संस्थांची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकूण २७०० ते ३००० शिक्षण संस्थांची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे.
कार्यप्रदर्शन मूल्यांकन अहवाल (पीएआर), वारंवार ईमेल, करून कारणे  दाखवा नोटीस दाखल करण्यासाठी चार महिन्यांपेक्षा जास्त वेळ देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या संस्थांवर एनसीटीईने  ही कारवाई केली आहे. तांत्रिक शिक्षणाची नियामक संस्था असलेल्या एआयसीटीईनेही सुमारे दहा वर्षांपूर्वी नियम आणि कायदे मोडणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द केली होती.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (एनईपी) लागू झाल्यानंतर, एनसीटीईने  शिक्षण संस्थांच्या गुणवत्तेची तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे सुमारे तीन हजार संस्था संशयाच्या भोवऱ्यात आल्या आहेत. त्या संस्थांना वारंवार ईमेल करून २०२१-२२ आणि २०२२-२३ चे कामगिरी मूल्यांकन अहवाल (PARs) मागवण्यात आले होते. परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आता  NCTE ने आतापर्यंतचा सर्वात कठोर निर्णय घेतला आहे आणि २ हजार  २२४ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द केली आहे आणि आणखी काही संस्थांची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

  इतक्या मोठ्या संख्येने शिक्षण संस्थांची मान्यता एकाच वेळी रद्द करण्याचा प्रकार NCTE च्या इतिहासात पहिल्यांदा घडला आहे. देशातील ज्या सर्व शिक्षण संस्थांची मान्यता रद्द केली जात आहे, तसेच ज्या संस्थांना मान्यता देण्यात आली आहे, त्यांची माहिती १२ जून २०२५ पर्यंत एनसीटीईच्या वेबसाइटवर अपलोड केली जाईल. NCTE  ने अद्याप या संस्थांची राज्यवार आकडेवारी प्रसिद्ध केलेली नाही.  
NCTE ने केलेल्या कारवाईत दक्षिण रिजन मध्ये  ८७२ शिक्षण संस्था, पश्चिम रिजन मध्ये  ६८६ संस्था, उत्तर रिजन मध्ये  ६३७ संस्था आणि पूर्व रिजन मध्ये  २९ संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.