ICSI जानेवारी २०२५ चा निकाल जाहीर 

आयसीएसआयने जानेवारी २०२५ सत्रासाठी सीएसईईटी परीक्षा ११ आणि १३ जानेवारी रोजी घेतली होती.  अवघ्या एका आठवड्यात निकाल तयार करून प्रसिद्ध करण्यात आला आहे.   कंपनी सेक्रेटरी (सीएस) कोर्ससाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा घेतली जाते.

ICSI जानेवारी २०२५ चा निकाल जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 


कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (Company Secretary Executive Entrance Test) CSEET जानेवारी २०२५ चा निकाल  इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (Institute of Company Secretaries of India) ICSI च्या अधिकृत वेबसाइट icsi.edu वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. (The results for January 2025 have been released) निकाल पाहण्यासाठी  उमेदवाराला त्याचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख योग्यरित्या प्रविष्ट करावी लागेल. हा निकाल फक्त icsi.edu वेबसाइटवर उपलब्ध असेल.  कोणत्याही उमेदवाराला वैयक्तिकरित्या निकालाची कोणतीही माहिती किंवा हार्ड कॉपी दिली जाणार नाही, असे इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आल आहे. 

आयसीएसआयने जानेवारी २०२५ सत्रासाठी सीएसईईटी परीक्षा ११ आणि १३ जानेवारी रोजी घेतली होती.  अवघ्या एका आठवड्यात निकाल तयार करून प्रसिद्ध करण्यात आला आहे.  कंपनी सेक्रेटरी (सीएस) कोर्ससाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा घेतली जाते. उमेदवार त्यांचा निकाल वेबसाइटवरून तपासल्यानंतर डाउनलोड करू शकतात. 

ICSI CSEET निकाल २०२५ तपासण्यासाठी आणि स्कोअरकार्ड डाउनलोड करण्यासाठी  उमेदवारांनी  सर्वप्रथम, icsi.edu या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.  वेबसाइटच्या होम पेजवरील परीक्षा विभागात जा आणि निकालाच्या लिंकवर क्लिक करा. पुढे, तुम्हाला आवश्यक लॉग इन क्रेडेन्शियल्स भरून ती सबमीट करा. तुमच्या स्क्रीनवर ICSI CSEET निकाल २०२५ दिसेल. निकाल तपासल्यानंतर तुम्ही ते डाउनलोड करून त्याची प्रिंटआऊट घ्या.