DRDO कडून प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरतीची घोषणा
या भरती मोहिमेअंतर्गत डीआरडीओमध्ये एकूण १५० अप्रेंटिस पदे भरली जातील. डीआरडीओने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, निवडलेल्या उमेदवारांची पहिली यादी २३ मे २०२५ रोजी प्रकाशित केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना १२ महिन्यांसाठी अप्रेंटिसशिप करण्याची संधी मिळेल.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मे २०२५ निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी NATS च्या अधिकृत वेबसाइट nats.education.gov.in ला भेट देऊन अर्ज करावा.
या भरती मोहिमेअंतर्गत डीआरडीओमध्ये एकूण १५० अप्रेंटिस पदे भरली जातील. डीआरडीओने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, निवडलेल्या उमेदवारांची पहिली यादी २३ मे २०२५ रोजी प्रकाशित केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना १२ महिन्यांसाठी अप्रेंटिसशिप करण्याची संधी मिळेल.
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे पदवी (अभियांत्रिकी - बीई/ बी.टेक), पदवीधर (नॉन इंजिनिअरिंग बी.कॉम./ बी.एससी./ बीए/ बीसीए, बीबीए), डिप्लोमा आणि आयटीआय असणे आवश्यक आहे. याशिवाय, प्रत्येक पदासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. तसेच
उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गांना वयात सूट दिली जाईल.
अर्ज कसा करायचा?
* सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट nats.education.gov.in वर जा.
* होमपेजवर दिलेल्या “अॅप्रेंटिस रजिस्ट्रेशन” लिंकवर क्लिक करा.
* आवश्यक माहिती भरून नोंदणी करा.
* लॉग इन करा, फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
* माहितीची पुष्टी करा आणि ती सबमिट करा.
* फॉर्म डाउनलोड करा आणि त्याचे प्रिंटआउट भविष्यासाठी सुरक्षित ठेवा.