NCERT BOOK : तिसरी, सहावीची पुस्तके बाजारात कधी येणार; बनवट पुस्तकांपासून सावध राहण्याचा इशारा 

इयत्ता-3 ची चार पुस्तके एनसीईआरटीच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली असून ही पुस्तके 20 ते 25 मे दरम्यान छापील स्वरूपात उपलब्ध करून दिली जातील.

NCERT BOOK : तिसरी, सहावीची पुस्तके बाजारात कधी येणार; बनवट पुस्तकांपासून सावध राहण्याचा इशारा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होऊन महिना उलटला असला तरीही अद्याप बऱ्याच ठिकाणी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद NCERT कडून इयत्ता 3 री आणि 6 वी ची पुस्तके (3rd and 6th standard books)उपलब्ध झालेली नाहीत. त्यातच  आता NCERT ची बनावट पुस्तके बाजारात (Fake NCERT books in the market)विकली जात असल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये काळजीचे वातावरण आहे. या पार्शवभूमीवर NCERT कडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे.

या विषयी अधिक माहिती देताना  एनसीईआरटीचे संचालक प्रा. दिनेश प्रसाद सकलानी म्हणाले , " इयत्ता-3 ची चार पुस्तके एनसीईआरटीच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली असून ही पुस्तके 20 ते 25 मे दरम्यान छापील स्वरूपात उपलब्ध करून दिली जातील. त्याचबरोबर इयत्ता 6वी ची पुस्तके तयार करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. जूनमध्ये छापील स्वरूपात पुस्तके येण्यास सुरुवात होईल. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत इयत्ता 3 आणि 6 ची सर्व पुस्तके छापली जातील."

प्रा. सकलानी म्हणाले "  विद्यार्थी आणि पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र,त्यांनी पायरेटेड पुस्तकांपासून सावध रहावे. कारण त्या पुस्तकांचा दर्जा चांगला नाही. महत्वाचे म्हणजे अभ्यासक्रमाचे साहित्यही चुकीचे आहे."

" एनसीईआरटी नवीन पुस्तके प्रकाशित करण्याच्या प्रक्रियेत वेगाने काम करत आहे. इयत्ता 3 री मध्ये तीन नवीन विषय जोडण्यात आले असून नवीन विषयांसाठी फाउंडेशन कोर्सही तयार करण्यात आला आहे. त्यामुळे 3 री  मध्ये सात पुस्तके असतील. इयत्ता  6 वी साठी तीन नवीन विषयांचा फाऊंडेशन कोर्स करण्यात आला आहे. कला शिक्षण, शारीरिक शिक्षण या विषयांची पुस्तकेही इयत्ता 6 मध्ये आणली जात आहेत. इयत्ता 6 वी साठी तयार करण्यात आलेल्या ब्रिज कोर्सला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे," असेही प्रा. सकलानी यांनी सांगितले.