UPSC NDA NA 1 चा अंतिम निकाल जाहीर

यशस्वी उमेदवारांना राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या शाखांच्या 153 व्या कोर्समध्ये आणि नौदल अकादमीच्या 115 व्या इंडियन नेव्हल अकादमी कोर्समध्ये प्रशिक्षण मिळेल. अंतिम निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांनंतर सर्व उमेदवारांचे गुण UPSC वेबसाइटवर अपलोड केले जातील.

UPSC NDA NA 1 चा अंतिम निकाल जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission) UPSC ने राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (National Defense Academy) NDA NA 1 चा अंतिम निकाल (NA 1 Final Result Declared) जाहीर केला असून उमेदवार आयोगाच्या https://upsc.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतील. आयोगाने 21 एप्रिल 2024 रोजी UPSC NDA आणि NA-1 परीक्षा घेतली होती. संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने UPSC NDA आणि NA 1 लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली होती.
यशस्वी उमेदवारांना राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या शाखांच्या 153 व्या कोर्समध्ये आणि नौदल अकादमीच्या 115 व्या इंडियन नेव्हल अकादमी कोर्समध्ये (INAC) प्रशिक्षण मिळेल. अंतिम निकाल जाहीर झाल्यापासून १५ दिवसांनंतर सर्व उमेदवारांचे गुण UPSC वेबसाइटवर अपलोड केले जातील. ही यादी तयार करताना वैद्यकीय चाचण्यांच्या निकालांचा विचार करण्यात आलेला नाही.
अंतिम निकाल तपासण्यासाठी UPSC NDA आणि NA 1 चा निकाल पाहण्यासाठी, संघ लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट https://upsc.gov.in/ ला भेट द्या. UPSC वेबसाइटच्या होम पेजवर उपलब्ध UPSC NDA आणि NA 1 अंतिम निकाल 2024 लिंकवर क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर एक नवीन PDF फाईल उघडेल. यामध्ये उमेदवार त्यांचा रोल नंबर आणि नाव तपासू शकतात. सर्व तपशील पूर्णपणे तपासल्यानंतर, अधिकृत निकाल पृष्ठ डाउनलोड करा. भविष्यातील संदर्भासाठी UPSC NDA आणि NA 1 अंतिम निकाल 2024 चा प्रिंटआउट घ्या.