UPSC CDS 1 साठी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर
या यादीत ज्या उमेदवारांची नावे आहेत ते SSB मुलाखतीसाठी पात्र मानले जातील. अधिक माहितीसाठी किंवा भरतीशी संबंधित तपशिलासाठी, उमेदवार दूरध्वनी क्रमांक 011-23385271/011- 23381125/011- 23098543 वर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत संपर्क साधू शकतात.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
संयुक्त संरक्षण सेवा (Combined Defence Services) CDS I परीक्षेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) UPSC द्वारे CDS 1 साठी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. (The final merit list has been announced) निकाल पीडीएफ स्वरूपात UPSC च्या https://upsc.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आला आहे.
UPSC CDS 1 गुणवत्ता यादी डाउनलोड करण्यासाठी, प्रथम https://upsc.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. वेबसाइटच्या होम पेजवर, तुम्हाला What's New विभागात अंतिम निकालाच्या पुढील PDF लिंकवर क्लिक करावे लागेल. स्क्रीनवर एक PDF उघडेल ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव आणि रोल नंबर तपासू शकता. UPSC CDS I 2024 अंतिम गुणवत्ता यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.