कांद्यासाठी सरकार पडू शकते, मग हवा आणि पाण्यासाठी का नाही पडणार; सोनम वांगचुक

हवा आणि पाण्याची समस्या निर्माण होत आहे. नागरिकांनी जे कांद्यासाठी केले, ते आज आपण हवा आणि पाण्यासाठी केले पाहिजे. यासाठी आपण आपल्या मताचा योग्य वापर करणे गरजेचे आहे, असे मत लडाखचे शिक्षण सुधारक व पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात व्यक्त केले.

कांद्यासाठी सरकार पडू शकते, मग हवा आणि पाण्यासाठी का नाही पडणार; सोनम वांगचुक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कांद्याचे भाव वाढले (Onion price increase) म्हणून देशातील नागरिकांनी सरकार बदलले. माणूस कांद्याशिवाय जगू शकतो. मात्र, शुद्ध हवा व पाण्याशिवाय जगू शकत नाही. आज पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत आहे. त्यामुळे हवा आणि पाण्याची समस्या (Air and water problems) निर्माण होत आहे. नागरिकांनी जे कांद्यासाठी केले, ते आज आपण हवा आणि पाण्यासाठी केले पाहिजे. यासाठी आपण आपल्या मताचा योग्य वापर करणे गरजेचे आहे, असे मत लडाखचे शिक्षण सुधारक (Education Reformer of Ladakh) व पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक (Environmentalist Sonam Wangchuk) यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात व्यक्त केले.

पुण्यातील नागरिकांनी उभ्या केलेल्या 'पुणे रिव्हर रिव्हायवल' चळवळीला पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचुक पुण्यात आले होते. यानिमित्ताने फ्रेंड्स ऑफ लडाख, 'फ्रेंड्स ऑफ नेचर पुणे'तर्फे गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेत सोनम वांगचुक यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई येथील डी. जे. फाउंडेशनचे दिलीप जैन, नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मूव्हमेंटचे संतोष ललवाणी, गुरुदास नूलकर, प्रीती मस्तकर यांच्यासह पर्यावरणप्रेमी व शेकडो विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. 

 'कांद्याची भाववाढ झाल्यानंतर सरकारला सत्तेतून खाली खेचणारे भारतीय स्वच्छ पाणी, शुद्ध हवा या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर का धरत नाहीत? 'सुरा भोसकणारा मोठा गुन्हेगार असतो, त्याप्रमाणे आपल्या भोगवादी, चंगळवादी जीवनशैलीमुळे स्वत: सह इतरांचेही आयुष्य अनैसर्गिकपणे घटविणाराही गुन्हेगार नाही का?, 'असा सवाल वांगचुक यांनी उपस्थित केला. 


आपल्या घराला आग लागली असेल तर त्यासाठी काही अजेंडा नसतो. आग विझवणाऱ्यांना विचारू नका की, तुमचा अजेंडा काय आहे. विचारायचेच असेल तर त्यांना विचारा जे हातावर हात ठेवून बसले आहेत.  तुम्ही खुप किंमती लोक आहेत, जसे शेती साठी बीज असते. बीज जर संपले तर शेती संपून जाईल आणि आपल्या अन्नाची सोय करणे कठीण होऊन बसेल. तुम्ही कमी आहेत परंतू खुप महत्त्वपूर्ण आहेत. कमी असाल तरी काही दु:खाची गोष्ट नाही. तुम्ही ते औषध आहेत जे असते तर एक-दोन थेंब परंतू सर्व शरीराला ठीक करते, असे मत सोनम वांगचुक यांनी व्यक्त केले आहे.