धक्कादायक : बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग, ३ डॉक्टरांना निलंबित

शैक्षणिक व परिषदांतील सुद्धा या डॉक्टरांच्या सहभागावर बंदी आणि प्रत्येकी 1 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 28 एप्रिल रोजी आलेल्या तक्रारीनंतर चौकशी समितीने 4 दिवसांत सखोल चौकशी करून ही कारवाई सुचवली. डॉ. अथर्व घोरपडे, डॉ. गौरव तिवारी आणि डॉ. राहुल जाधव यांनी रॅगिंग केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

धक्कादायक : बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग, ३ डॉक्टरांना निलंबित

एज्युवार्त न्यूज नेटवर्क 

पुण्यातील बी. जे मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग (Ragging At B J Medical College) होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन डॉक्टरांवर कारवाई केली असल्याची देखील माहिती मिळतेय. बी. जे. मेडिकल कॉलेजमधील तीन डॉक्टरांना सहा महिन्यांसाठी निलंबित (Three doctors suspended for six months) करण्यात आलाय. त्यांना महाविद्यालय एप्रिल महिन्यात एका नामांकित शिक्षण संस्थेच्या संस्थापक असलेल्या व्यक्तीच्या नातवावर रॅगिंग झाल्याचा प्रकार घडला. ही घटना पुण्यातील बी.जे. मेडिकल (B J Medical College) वैद्यकीय महाविद्यालयात घडली होती. त्यानंतर आता रॅगिंग केल्याचे निष्पन्न झाले आहेत. 

निलंबित डॉक्टर यांना महाविद्यालय आणि वसतिगृहात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. शैक्षणिक व परिषदांतील सुद्धा या डॉक्टरांच्या सहभागावर बंदी आणि प्रत्येकी 1 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 28 एप्रिल रोजी आलेल्या तक्रारीनंतर चौकशी समितीने 4 दिवसांत सखोल चौकशी करून ही कारवाई सुचवली. डॉ. अथर्व घोरपडे, डॉ. गौरव तिवारी आणि डॉ. राहुल जाधव यांनी रॅगिंग केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

एप्रिल महिन्यामध्ये एका नामांकित शिक्षण संस्थेचे संस्थापक असलेल्या व्यक्तीच्या नातवावरती पुण्यातील बी.जे. मेडीकल वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रॅगींगचा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. हा मुलगा बी.जे मेडीकल वैद्यकीय महाविद्यालयात एम एस होण्यासाठी आर्थोपेडीक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. याच डीपार्टमेंटमध्ये दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी त्याच्यावर रॅगींग केल्याचा आरोप आहे. दरम्यान याबाबतची तक्रार देऊन देखील त्याकडे पुरेशी दखल घेतली नाही, असा या विद्यार्थ्याने आरोप केला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू होती. अँटी रॅगिंग कमिटी स्थापन करण्यात आली होती, 15 ते 20 जण या कमिटीमध्ये होते. तीन विद्यार्थ्यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या वर्षात शिकणाऱ्या या विद्यार्थ्याला त्यांचे दोन सिनिअर्स डीपार्टमेंटमधे डोक्यावरुन कधी गार पाणी ओतून घ्यायला लावायचे, तर कधी गरम पाणी ओतून घ्यायला लावायचे. या मुलाने ही गोष्ट आधी आर्थोपीडीक डीपार्टमेंटचे विभागप्रमुख डॉक्टर गीरीष बारटक्के यांना सांगितली होती. मात्र त्यांनी पुरेशी दखल घेतली नाही, असा या मुलाचा आरोप आहे. त्यानंतर ससून रूग्णालयाचे डीन डॉक्टर एकनाथ पवार यांना देखील ही बाब सांगण्यात आली. मात्र त्यांनीही पुरेशी दखल न घेतल्याने मुंबईला वैद्यकिय शिक्षण विभागाकडे दाद मागण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीच्या अहवालानंतर तीन विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी म्हणजे अभ्यासक्रमाच्या एका टर्मसाठी निलंबीत करण्यात आलं आहे.