भावे हायस्कूलजवळ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ७-८ विद्यार्थ्यांना कारने उडवले
पुण्यातील मध्यवर्ती भागात भावे हायस्कूलजवळ स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी त्या परिसरात राहतात. संध्याकाळी सगळे विद्यार्थी तिथं चहा घेत होते. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानंतर त्यानं विद्यार्थ्यांना धडक दिली. या घटनेत 7-8 विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार सुरू आहेत, 2 विद्यार्थी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

एज्युवार्त न्यूज नेटवर्क
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील भावे हायस्कूलजवळ (Accident near Bhave High School) एका कारनं 7-8 विद्यार्थ्यांना उडवलं (7-8 student car accident) आहे. एमपीएससी परीक्षांची (MPSC Exam) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कारनं उडवल्याची माहिती आहे. जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विश्रामबाग पोलीस स्टेशनचे (Vishrambagh Police Station) पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पुण्यातील मध्यवर्ती भागात भावे हायस्कूलजवळ स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी त्या परिसरात राहतात. संध्याकाळी सगळे विद्यार्थी तिथं चहा घेत होते. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानंतर त्यानं विद्यार्थ्यांना धडक दिली. या घटनेत 7-8 विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार सुरू आहेत, 2 विद्यार्थी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
पुण्यातील मध्यवर्ती भागात झालेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. विश्रामबाग पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात हा अपघात झाला आहे. या परिसरात विद्यार्थी नेहमीप्रमाणे चहा घ्यायला येत असतात. समोर कार आली आणि कार चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर हा मोठा अपघात झाला. कार चालकाने मद्यप्राशन केलं असावं, अशी शंका देखील व्यक्त करण्यात आली आहे. कार भरधाव वेगानं आली आणि कारचालकाचं नियंत्रण सुटल्यानं 7-8 विद्यार्थी जखमी झाले आहेत.
पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूल जवळ मोठा अपघात झाला आहे. कार चालकाने सात ते आठ जणांना उडवले असल्याची माहिती आहे. ही घटना संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली घटना आहे. चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी आलेल्या एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जखमींमध्ये समावेश आहे. जखमींना संचेती आणि मोडक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि विश्रामबाग पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतलं आहे. मद्यप्राशन करून कॅब चालक कार चालवत होता. भावे हायस्कूल जवळ काही विद्यार्थी एका चहाच्या टपरीवर चहा पीत असताना अपघात घडला आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी असून नऊ जण किरकोळ जखमी झाल्याची पोलिसांची माहिती आहे. यापैकी काही विद्यार्थ्यांची उद्या परीक्षा असून ते उद्या या परीक्षेला सामोरे जाणार होते.