ICAI CA सप्टेंबर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

आयसीएआयने स्पष्ट केले की ५ सप्टेंबर २०२५ (शुक्रवार) रोजी मिलाद-उन-नबीच्या सुट्टीमुळे कोणतीही परीक्षा होणार नाही, तसेच  आयसीएआयने असेही म्हटले आहे की जरी एखादा दिवस सार्वजनिक सुट्टी घोषित केला गेला तरी परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल होणार नाही.

ICAI CA सप्टेंबर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (The Institute of Chartered Accountants of India) ICAI ने सप्टेंबर २०२५ मध्ये होणाऱ्या CA परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे. (CA exam schedule published on official website) या वेळापत्रकात सर्व फाउंडेशन, इंटरमीडिएट आणि फायनल अभ्यासक्रमांचा समावेश आहे. ICAI ने जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकाद्वारे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. 

संपूर्ण परीक्षेची तारीख खालीलप्रमाणे आहे


सीए अंतिम अभ्यासक्रम
गट I: ३, ६ आणि ८ सप्टेंबर २०२५
गट II: १०, १२ आणि १४ सप्टेंबर २०२५
सीए इंटरमिजिएट अभ्यासक्रम
गट I: ४, ७ आणि ९ सप्टेंबर २०२५
गट II: ११, १३ आणि १५ सप्टेंबर २०२५
सीए फाउंडेशन अभ्यासक्रम
१६, १८, २० आणि २२ सप्टेंबर २०२५


परीक्षेच्या वेळा

फाउंडेशन पेपर १ आणि २ :  दुपारी २:०० ते ५:००
फाउंडेशन पेपर ३ आणि ४ :  दुपारी २:०० ते ४:००
सर्व पेपर्स इंटरमिजिएट : दुपारी २:०० ते ५:००
अंतिम पेपर १ ते ५ :  दुपारी २:०० ते ५:००
अंतिम पेपर ६ : दुपारी २:०० ते ६:०० 
आयसीएआयने स्पष्ट केले की ५ सप्टेंबर २०२५ (शुक्रवार) रोजी मिलाद-उन-नबीच्या सुट्टीमुळे कोणतीही परीक्षा होणार नाही, तसेच  आयसीएआयने असेही म्हटले आहे की जरी एखादा दिवस सार्वजनिक सुट्टी घोषित केला गेला तरी परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल होणार नाही.


इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारे सप्टेंबर २०२५ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरुवात 5 जुलै पासून होईल. 

अर्ज भरण्यासाठी महत्वाच्या तारखा 


* ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्याची सुरुवात ५ जुलै २०२५
* विलंब शुल्काशिवाय अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०२५
* विलंब शुल्क ₹६०० किंवा US $१० सह अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२५
* परीक्षा केंद्र / माध्यम बदलण्यासाठी दुरुस्तीची वेळ २२ जुलै २०२५ ते २४ जुलै २०२५