ITI Admission : 'आयटीआय' प्रवेश प्रक्रियेला सुरूवात, सविस्तर वेळापत्रक जाहीर 

आयटीआय प्रवेशाच्या सविस्तर माहिती आणि वेळापत्रकासाठी https://admission.dvet.gov.in/ या वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन डीव्हीईटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ITI Admission : 'आयटीआय' प्रवेश प्रक्रियेला सुरूवात, सविस्तर वेळापत्रक जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यासंदर्भात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) कडून आयटीआय प्रवेशाचे (ITI Admission) वेळापत्रक प्रसिद्ध (Schedule released) करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार सोमवारी 3 जूनपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात (Online application process starts from 3rd June) होत आहे. आयटीआय प्रवेशाच्या सविस्तर माहिती आणि वेळापत्रकासाठी https://admission.dvet.gov.in/ या वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन डीव्हीईटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दहावीच्या निकालानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाची प्रक्रिया कधी होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले होते. नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आणि प्रवेश अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबतचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे

3 जून ते 30 जून पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार असून याच कालावधीत अर्जात दुरुस्ती करता येणार आहे. 5 जून ते 1 जुलै या कालावधीत प्रवेश अर्ज निश्चित करता येईल. 5 जून ते 2 जुलै पहिल्या फेरीसाठी प्राधान्यक्रम सादर करणे.  4 जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.  4 ते 5 जुलै या कालावधीत गुणवत्ता यादीवर हरकती नोंदवणल्या जातील.  7 जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. 14 जुलै रोजी पहिली प्रवेश फेरी होईल.  15 ते 19 जुलै रोजी दुसरी प्रवेश फेरी होईल. 28 जुलै ते 2 ऑगस्ट रोजी  तिसरी प्रवेश फेरी होईल आणि  26 ऑगस्ट रोजी  संस्थास्तरावर समुपदेश फेरी पार पडेल.