नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई विद्यापीठाचा 'आयडीयाथॉन १.०’ 

नवकल्पना व नवसंशोधनांना स्टार्टअपमध्ये रुपांतर करणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विद्यापीठाच्या एमयु- आयडियाज् इन्क्युबेशन सेंटर कडून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई विद्यापीठाचा 'आयडीयाथॉन १.०’ 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नवउद्योजकांना आवश्यक मदत (Necessary help for new entrepreneurs) व अर्थसहाय्य करून त्यांना त्यांचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) ‘आयडीयाथॉन १.०’ (Ideathon 1.0)  या उपक्रमाची  घोषणा केली आहे. नवकल्पना व नवसंशोधनांना स्टार्टअपमध्ये रुपांतर करणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विद्यापीठाच्या एमयु- आयडियाज् इन्क्युबेशन सेंटर (MU- Ideas Incubation Center) कडून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

या उपक्रमाची माहिती देताना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी म्हणाले, " आयडीथॉन १.०’ च्या माध्यमातून नवउद्योजकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य उपक्रमांमध्ये रुपांतर करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे."

विद्यापीठाच्या या इन्क्युबेशन सेंटरला महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या माध्यमातून रुपये ५ कोटीचे अनुदान मंजूर करण्यात आलेले असून विद्यापीठाच्या कलिना संकुलातील ग्रीन टेक्नोलॉजी इमारतीमध्ये हे इन्क्युबेशन सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. आयडियाज् इन्क्युबेशन सेंटर  या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत विविध नव प्रतिभावंताच्या संकल्पनांना नवउद्योगांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे, असेही कुलकर्णी म्हणाले.