शिक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदतीचा हात
राज्यातील शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी राज्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 लाख 31 हजार 111 रुपयांचा धनादेश सुपूर्त केला आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे व जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीच्या (Chief Ministers Aid Fund) माध्यमातून संवेदनशील व्यक्ती व संस्थांमधून मदतीचा हात पुढे केला जात आहे. राज्यातील शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी (Retired officer from the education department)राज्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 लाख 31 हजार 111 रुपयांचा धनादेश सुपूर्त केला आहे.
राज्याचे माजी प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर (Dinkar Temkar) व माजी माध्यमिक शिक्षण संचालक एन.के. जरग (N.K. Jarag)यांच्यासह विद्याधर शुक्ला, शिवाजी तांबे, भीमराव फडतरे या शिक्षण अधिकाऱ्यांनी हा मदतीचा धनादेश पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्याकडे सुपूर्त केला.
राज्यात पुरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या घटना घडत असल्याच्या वार्ता कानावर येत आहेत.त्यामुळेच माणुसकीच्या भावनेतून शिक्षण अधिकारी यांनी एकत्र येऊन मदत करण्याचा निर्णय घेतला.त्यातील काही अधिकारी हे परदेशात वासाव्यास आहेत. तरीही या अधिकाऱ्यांनी ही मदत केली आहे.