मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम जाहीर; महिन्याला ६० हजार रुपये मानधन 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६’ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या कार्यक्रमाअंतर्गत ६० फेलोंची निवड करण्यात येणार आहे. त्यानुसार निवड झालेल्या उमेदवारांना महिन्याला ६१ हजार ५०० रुपयांचे मानधन दिले जाणार आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम जाहीर; महिन्याला ६० हजार रुपये मानधन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा. तसेच त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतील ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६’ (Chief Minister's Fellowship Program 2025-26) जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत ६० फेलोंची निवड करण्यात येणार आहे. त्यानुसार निवड झालेल्या उमेदवारांना महिन्याला ६१ हजार ५०० रुपयांचे मानधन (Monthly honorarium of 61 Thousand 500 hundred) दिले जाणार आहे.

फेलोंच्या निवडीसंदर्भातील निकष, नियुक्तीसंदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणीबाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत केली जाईल.

पात्रता -

अर्जदार भारताचा नागरिक असावा. तो कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. (किमान ६०% गुण आवश्यक) त्याला किमान १ वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असावा. तसेच, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप /आर्टीकलशिपसह १ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल. उमेदवाराला मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील. उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान २१ वर्षे व कमाल २६ वर्षे असावे.