राज्यातील सर्व शिक्षक एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार; शिक्षणमंत्र्याची माहिती 

महाराष्ट्रात काही दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक गावांना महापुरामुळे तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील पुरस्थितीवर मात करण्यासाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. सामाजिक संस्था व उद्योगपती देखील आपापल्या परीने मदत उभारत आहेत.

राज्यातील सर्व शिक्षक एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार; शिक्षणमंत्र्याची माहिती 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मराठवाड्यातील नुकसान (Agricultural damage in Marathwada) झालेल्या शेतकऱ्यांना भाजपच्या सर्व आमदार आणि खासदारांनी एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेतला. भाजपचे सर्व कार्यकर्ते, खासदार आणि आमदार मदत करणार आहेत. त्यानंतर आता राज्यातील सर्व शिक्षक एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी (Chief Minister's Relief Fund) देणार आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खारीचा वाटा म्हणून ही एक छोटीशी आर्थिक मदत (Financial assistance from teachers) करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. 

वैद्यकीय शिक्षण विभागाने २५, २६ सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्रात काही दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक गावांना महापुरामुळे तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील पुरस्थितीवर मात करण्यासाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. सामाजिक संस्था व उद्योगपती देखील आपापल्या परीने मदत उभारत आहेत. राज्यातील अनेक शिक्षक संघटनांनी याबाबतचे स्वत: निवेदन दिले असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी माध्यमांना दिली आहे. 

पक्षाच्या पातळीवर मोठ्या प्रमाणावर निधी गोळा होत आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने शिक्षकांनाही या मदत उपक्रमात सामील करून घेतले आहे. राज्यात शिक्षकांची संख्या लाखोंमध्ये असल्याने, या निर्णयामुळे मोठा निधी उभा राहणार आहे. या रकमेतून पुरग्रस्तांना तातडीची मदत व पुनर्वसनासाठी उपयोग केला जाणार आहे.