पुण्याचे 'आयआयएम'चे स्वप्न भंगले, शाखेचा विस्तार करण्यावर भर.. 

देशात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराचे औद्योगिक आणि शैक्षणिक महत्त्व ओळखून अनेक शैक्षणिक संस्थांनी मॅनेजमेंट शिक्षण देण्यासाठी महाविद्यालयांची स्थापना केली. हीच गरज ओळखून शिक्षणतज्ज्ञ आणि अभ्यासकांनी पुण्यात स्वतंत्र 'आयएआयएम'ची स्थापना करून, त्याचा ब्रँड विकसित करण्यासाठी मागणी केली होती. 'आयआयएम, नागपूर' सुमारे चार वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड परिसरात सुरू झाले आणि काही दिवसांपूर्वी मोशी परिसरात विस्तारिकरणासाठी ७० एकर जागा देण्यात आली.

पुण्याचे 'आयआयएम'चे स्वप्न भंगले, शाखेचा विस्तार करण्यावर भर.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात (Pune and Pimpri-Chinchwad area) आयटी, उत्पादन आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये कुशल मनुष्यबळाची गरज असून, त्याच्या निर्मितीसाठी पुण्याला स्वतंत्र इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची (आयआयएएम) गरज आहे. मात्र, 'आयआयएम, पुणे' ('IIM, Pune') या स्वतंत्र संस्थेची स्थापना होण्याऐवजी सरकारकडून पुण्यात 'आयआयएम'च्या शाखांचा विस्तार करण्यावर भर देण्यात येत असून, 'आयआयएम, नागपूर' (IIM, Nagpur) नंतर आता 'आयआयएम, मुंबई'ची शाखा (केंद्र) पुढील शैक्षणिक वर्षात सुरू होणार आहे. आता दोन संस्थाच्या शाखा पुण्यात आल्याने 'आयआयएम, पुणे'चे स्वप्न भंगले आहे.

राज्यातील सर्व शिक्षक एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार; शिक्षणमंत्र्याची माहिती

देशात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराचे औद्योगिक आणि शैक्षणिक महत्त्व ओळखून अनेक शैक्षणिक संस्थांनी मॅनेजमेंट शिक्षण देण्यासाठी महाविद्यालयांची स्थापना केली. हीच गरज ओळखून शिक्षणतज्ज्ञ आणि अभ्यासकांनी पुण्यात स्वतंत्र 'आयएआयएम'ची स्थापना करून, त्याचा ब्रँड विकसित करण्यासाठी मागणी केली होती. 'आयआयएम, नागपूर' सुमारे चार वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड परिसरात सुरू झाले आणि काही दिवसांपूर्वी मोशी परिसरात विस्तारिकरणासाठी ७० एकर जागा देण्यात आली.

'आयआयएम, नागपूर' पाठोपाठ आता 'आयआयएम, मुंबई'चे केंद्र पुण्यात सुरू होणार आहे. या निमित्ताने पुण्याचे शैक्षणिक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. केंद्रीय नागरी वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाला संस्थेच्या अधिष्ठाता समिती आणि त्यानंतर विद्या परिषदेने मान्यता दिल्यानंतर हा निर्णय अधिकृत झाल्याची माहिती मोहोळ यांच्या कार्यालयाने दिली आहे. त्यामुळे पुणेकरांचे 'आयआयएम'चे संपल्यात जमा आहे.

__________________________________________

शिक्षणाचे माहेरघर व औद्योगिकरणाचे जाळे पसरलेल्या आपल्या पुण्यात, विद्यार्थ्यांची मागणी असतानाही 'आयआयएम' मंजूर करण्यात आले नाही. यामुळे पुण्याचे शिक्षणातील महत्व कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे. आज देशविदेशातील विद्यार्थ्यांची पसंती पुण्याला आहे. स्टार्टअपलाच्या धोरणात सहभागी होऊन उद्योग उभे करणाऱ्या तरुणांची संख्या पुण्यात लक्षणीय आहे, त्यामुळे पुण्याला वेगळी आयआयएम न मिळणे हे आश्चर्यचकित करणारे आहे.

- कल्पेश यादव, सहसचिव युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)