CET Cell : MBA प्रवेशाची पहिली यादी जाहीर; १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे कॉलेज

एमबीए/एमएमएस प्रवेशासाठी एकूण ५२ हजार ३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५१ हजार ५६९ विद्यार्थ्यांनी वेळेत पसंतीक्रम भरले होते. या विद्यार्थ्यांनाच पहिल्या फेरीत विचारात घेण्यात आले. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांना आता दिलेल्या महाविद्यालयातच प्रवेश घेणे अनिवार्य आहे.

CET Cell : MBA प्रवेशाची पहिली यादी जाहीर; १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे कॉलेज

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (State Common Entrance Test) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी (Academic year 2026-27) एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमाच्या (MBA/MMS Programme) प्रवेश प्रक्रियेची पहिली कॅप फेरी यादी जाहीर (First CAP round list announced) केली आहे. या यादीत ५१ हजार ५६९ विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार ९५० विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे, १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांना (17 thousand 883 students placed in the first list) त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून, त्यांचा प्रवेश ऑटो फ्रिज झाला आहे. 

एमबीए/एमएमएस प्रवेशासाठी एकूण ५२ हजार ३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५१ हजार ५६९ विद्यार्थ्यांनी वेळेत पसंतीक्रम भरले होते. या विद्यार्थ्यांनाच पहिल्या फेरीत विचारात घेण्यात आले. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांना आता दिलेल्या महाविद्यालयातच प्रवेश घेणे अनिवार्य आहे. एमबीए/एमएमएस प्रवेशासाठी एकूण ५२ हजार ३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५१ हजार ५६९ विद्यार्थ्यांनी वेळेत पसंतीक्रम भरले होते. या विद्यार्थ्यांनाच पहिल्या फेरीत विचारात घेण्यात आले. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांना आता दिलेल्या महाविद्यालयातच प्रवेश घेणे अनिवार्य आहे. जर त्यांनी हा प्रवेश नाकारला तर त्यांना दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या फेरीत भाग घेता येणार नाही. त्यांना थेट संस्थास्तरीय खुल्या फेरीत प्रवेश प्रक्रिया करावी लागेल.

पहिल्या फेरीत जागा मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ३ ते ५ ऑगस्ट २०२६ दरम्यान संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे, शुल्क भरणे आणि प्रवेश निश्चित करणे गरजेचे आहे. यानंतर ६ ऑगस्ट २०२६ रोजी दुसऱ्या फेरीसाठी तात्पुरत्या रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्यातील ३९९ व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये पहिल्या फेरीसाठी एकूण ५२ हजार ०३६ जागा उपलब्ध होत्या.

विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या सर्व मुदतींची नोंद घ्यावी आणि अधिकृत वेबसाइटवर नियमित अपडेट तपासावेत, असे सीईटी सेलने आवाहन केले आहे. पहिल्या फेरीत जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची संधी असल्याने त्यांनी वेळेत कार्यवाही पूर्ण करावी.