विद्यापीठात राडा; विद्यार्थी चढले कुलगुरूंच्या गाडीवर, 'ते' परिपत्रक रद्द न केल्यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक

'कुलगुरू पळाले' अशा पद्धतीची वाच्यता केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे विद्यापीठाचे वातावरण चांगलेच तापले. विद्यार्थी संघटनांनी आंदोलनावरील निर्बंधासंदर्भातील परिपत्रक मागे घेतले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाईल, असा इशारा दिला आहे.

विद्यापीठात राडा; विद्यार्थी चढले कुलगुरूंच्या गाडीवर, 'ते' परिपत्रक रद्द न केल्यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनांनी राडा घातल्याची माहिती समोर आली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक संपल्यानंतर विद्यापीठात आंदोलन करण्यासंदर्भातील परिपत्रकावर सकारात्मक उत्तर न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच कुरुगुरूंच्या गाडीवर चढून आणि गाडी समोर उड्या मारून राडा घातला. त्यामुळे विद्यापीठाचे वातावरण चांगलेच तापले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांनी केवळ विद्यापीठाशी संबंधित आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत आंदोलन करावे, असा ठराव विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये करण्यात आला. त्यावर विविध विद्यार्थी संघटनांनी संताप व्यक्त करत दोन दिवसापूर्वी आंदोलन केले. याबाबत व्यवस्थापन परिषदेत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आंदोलक विद्यार्थ्यांना प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यानंतर संघटनांनी आंदोलन स्थगित केले. परंतु, बुधवारी व्यवस्थापन परिषदेत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सकारात्मक निर्णय घेतला गेला नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यानंतर विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या बाहेर जाणाऱ्या कुलगुरूंच्या गाडीसमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले.तसेच गाडीवर उड्या मारून कुलगुरूंना जाण्यापासून अडवले. त्यामुळे कुलगुरू विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपासून पायी चालत कुलगुरू निवासस्थानी गेले. 

दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'कुलगुरू पळाले' अशा पद्धतीची वाच्यता केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे विद्यापीठाचे वातावरण चांगलेच तापले. विद्यार्थी संघटनांनी आंदोलनावरील निर्बंधासंदर्भातील परिपत्रक मागे घेतले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाईल, असा इशारा दिला आहे.

---------------------------

 विद्यापीठाच्या परिपत्रकाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बाधा आणण्याचा मुळीच नाही. त्यामुळे सदर परिपत्रकाची अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्याची तात्काळ दखल घेऊन परवानगी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. विद्यापीठाच्या आवाराची मुख्यतः सर्व प्रवेशद्वारावरील सुरक्षा व्यवस्था राबवित असताना विद्यार्थ्यांना अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी, असा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे प्रकटन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी प्रसिद्ध केले आहे.