शालार्थ आयडी घोटाळ्यात आणखी एक अधिकारी अटक; 11 शाळांना 95 बनावट शालार्थ आयडी

उपसंचालक कार्यालयातील मूळ शालार्थ मंजुरी आदेश प्राप्त नसताना कोणतीही पडताळणी न करता 11 शाळांच्या 95 बनावट शालार्थ आयडी प्रणालीतील कार्यालयीन कागदपत्र तपासणी न करता वेतन अदा केल्याचे निष्पन्न झाले आहे.याप्रकरणी राजमोहन शर्मा यांना अटक करण्यात आली आहे.

शालार्थ आयडी घोटाळ्यात आणखी एक अधिकारी अटक; 11 शाळांना 95 बनावट शालार्थ आयडी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

गेल्या काही कालावधीपासून राज्यभर गाजत असलेल्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात धक्कादायक माहिती समोर आली असून एका सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक करण्यात आले आहे. नाशिकच्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने राजमोहन शर्मा यांना आंबेजोगाई येथून अटक केली आहे. त्यामुळे शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात आणखी काही कर्मचारी व अधिकारी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी राज्य शासनाने एसआयटी स्थापन केली होती. राज्यभरातून विविध ठिकाणाहून बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात शिक्षण विभागातील अनेक आजी-माजी अधिकाऱ्यांना अटक केली जात आहे. त्यात आता उपसंचालक कार्यालयातील मूळ शालार्थ मंजुरी आदेश प्राप्त नसताना कोणतीही पडताळणी न करता 11 शाळांच्या 95 बनावट शालार्थ आयडी प्रणालीतील कार्यालयीन कागदपत्र तपासणी न करता वेतन अदा केल्याचे निष्पन्न झाले आहे.याप्रकरणी राजमोहन शर्मा यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर संस्थाचालक संजय गरुड व त्याचा भाऊ दीपक गरुड यांचा कारागृहातील मुक्काम वाढला असून नाशिक रोड सत्र न्यायालयाने या तिघांचाही जामीन फेटाळला आहे.