ओएनजीसी'मध्ये 3047 जागांसाठी मोठी भरती; दहावीपासून पदवीधरांना संधी

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अर्थात ओएनजीसीने देशभरातील युवकांसाठी अप्रेंटिस पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. या भरतीमध्ये एकूण 3047 जागा उपलब्ध असून त्यामध्ये ट्रेड अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस या तीन श्रेणींचा समावेश आहे.

ओएनजीसी'मध्ये 3047 जागांसाठी मोठी भरती; दहावीपासून पदवीधरांना संधी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अर्थात ओएनजीसीने देशभरातील युवकांसाठी अप्रेंटिस पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. या भरतीमध्ये एकूण 3047 जागा उपलब्ध असून त्यामध्ये ट्रेड अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस या तीन श्रेणींचा समावेश आहे. दहावी, बारावी, आयटीआय, पदवी किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांना ओएनजीसीचे अधिकृत वेबसाइट ongcindia.com वर जाऊन 20 नोव्हेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत ट्रेड अप्रेंटिस पदाच्या 1973 जागा, पदवीधर अप्रेंटिस पदाच्या 890 जागा आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदाच्या 174 जागा भरल्या जाणार आहेत. अशाप्रकारे एकूण 3047 जागांवर उमेदवारांना प्रशिक्षण घेण्याची आणि अनुभव मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. निवड झालेल्यांना देशभरातील ओएनजीसीच्या विविध कार्यालयांमध्ये आणि प्रकल्पांमध्ये काम करता येईल.

ट्रेड अप्रेंटिस पदासाठी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण अथवा संबंधित ट्रेडमधील आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यामध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, ड्राफ्ट्समॅन, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मेकॅनिक आणि इतर अनेक व्यावसायिक ट्रेडांचा समावेश आहे. पदवीधर अप्रेंटिस पदांसाठी बीए, बीकॉम, बीएस्सी, बीबीए, बीई किंवा बीटेक सारख्या पदव्या आवश्यक असून संबंधित विषयातील विशिष्ट पात्रता लागू असू शकते.

टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी संबंधित अभियांत्रिकी शाखेतील 3 वर्षांचा डिप्लोमा अनिवार्य आहे. यात संगणक विज्ञान, विद्युत, यांत्रिकी, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या शाखांचा समावेश आहे. वयोमर्यादा बाबत उमेदवारांचे वय 29 नोव्हेंबर 2026 रोजी 18 ते 24 वर्षांदरम्यान असावे. अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांना 5 वर्षे तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्षे वयोमर्यादेत सूट मिळेल.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. इच्छुकांनी 20 नोव्हेंबर 2026 पर्यंत ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज सादर करावा. निवड प्रक्रिया अधिकृत जाहिरातीतील निकषांनुसार राबवली जाईल. ही भरती युवकांना तेल व वायू क्षेत्रात व्यावसायिक अनुभव मिळवण्याची उत्तम संधी ठरू शकते.