जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत मोठा बदल ; गेल्या 10 वर्षात प्रश्नांची संख्या सर्वात कमी 

पहिल्या सत्रात पेपर १ घेण्यात आला तर दुसऱ्या सत्रात पेपर २ घेण्यात आला. दोन्ही पेपर्समध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित असे तीन विभाग होते. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत एकूण ५४ प्रश्न होते. प्रत्येक विभागात १८ प्रश्न विचारण्यात आले होते. मागील वर्षाप्रमाणेच यंदा देखील 180 गुणांचा पेपर होता 

जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत मोठा बदल ; गेल्या 10 वर्षात प्रश्नांची संख्या सर्वात कमी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आयआयटी आणि इतर सहभागी संस्थांमध्ये अभियांत्रिकी कार्यक्रमांच्या प्रवेशासाठी १८ मे रोजी JEE अॅडव्हान्स्ड (JEE Advanced) परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा तीन तासांच्या कालावधीसाठी आणि दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली. पहिली शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसरी शिफ्ट दुपारी २:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत घेण्यात आली. या  परीक्षेचे वैशिष्ट म्हणजे या परीक्षेत  मागील 10 वर्षांच्या तुलनेत  सर्वात कमी प्रश्न विचारण्यात आली होती. (record of least, number of questions, in 10 years) ही संख्या जवळपास निम्मी आहे. 

पहिल्या सत्रात पेपर १ घेण्यात आला तर दुसऱ्या सत्रात पेपर २ घेण्यात आला. दोन्ही पेपर्समध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित असे तीन विभाग होते. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत एकूण ५४ प्रश्न होते. प्रत्येक विभागात १८ प्रश्न विचारण्यात आले होते. मागील वर्षाप्रमाणेच यंदा देखील 180 गुणांचा पेपर होता 

 मीडिया  रिपोर्ट नुसार  गेल्या २ वर्षात विचारलेल्या प्रश्नांच्या तुलनेत यंदा प्रश्नपत्रिकेत  ५१ प्रश्न कमी विचारण्यात आली होती.  गेल्या 10  वर्षांच्या  परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले असता असे दिसून येते की विचारलेल्या प्रश्नांची संख्या निम्याने कमी झाली आहे.

२०१५ मध्ये १२० प्रश्न विचारले गेले होते.  २०२० मध्ये १२० प्रश्न विचारले गेले होते. तथापि, त्यानंतर प्रश्नांची संख्या सतत वाढत किंवा कमी होत गेली. २०१६ ते २०२० या ५ वर्षात १०८ प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर २०२१ मध्ये प्रश्नांची संख्या ११४ झाली. त्यानंतर २०२३ आणि २०२४ मध्ये २ वर्षांसाठी १०२ प्रश्न विचारण्यात आले होतेयंदा ही संख्या 54 होती.