शिक्षकांच्या पगाराला विलंब होणार का? आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण ..
नवीन वर्षात सुद्धा शिक्षकांना नेहमीप्रमाणेच नियोजित तारखेच्या आत वेतन मिळणार आहे. त्यामुळे वेतनाला विलंब होणार ही केवळ अफवा आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याच्या तिजोरीत शिक्षकांच्या पगारासाठी पैसा (Money for teachers salaries) नसल्याने शिक्षकांचे वेतन रखडणार (Salary of teachers will be stopped)असल्याची अफवा पसरली आहे. मात्र, वेतनासाठी आवश्यक असलेली ग्रॅण्ड गुरुवारीच प्राप्त झाली आहे. त्यामुळे शिक्षकांचे वेतन नियोजित कालावधीत (Salary of teachers in scheduled period)होणार असल्याचे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी (senior officials of the Education Department)सांगितले आहे . त्यामुळे नवीन वर्षात सुद्धा शिक्षकांना नेहमीप्रमाणेच नियोजित तारखेच्या आत वेतन मिळणार आहे. त्यामुळे वेतनाला विलंब होणार ही केवळ अफवा आहे.
राज्य शासनातर्फे प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने केले जाते. वेतन अधीक्षक कार्यालयातर्फे याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली जाते. दर महिन्याला 25 ते 26 तारखेपर्यंत शासनाकडून वेतनासाठी आवश्यक असलेली ग्रॅण्ड शासनाकडून जमा केली जाते. त्यानुसार 26 डिसेंबर रोजी शिक्षकांच्या वेतनासाठी आवश्यक असलेली ग्रॅंड प्राप्त झाली असून ही ग्रँड संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे वेतनास विलंब होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे शिक्षण आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालया अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांचे वेतन करण्यासाठीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे आदेश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. परिणामी सोमवारी व मंगळवारी पगार बिले प्राप्त करून त्यावरील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दोन दिवस ट्रेझरीच्या माध्यमातून आवश्यक कामकाज केले जाईल. त्यामुळे नेहमीप्रमाणे एक ते पाच तारखेपर्यंत सर्व शिक्षकांच्या खात्यात त्यांचे वेतन जमा होईल. कोणत्याही शिक्षकाचे वेतन करण्यास विलंब होणार नाही, असेही आयुक्त कार्यालयातील शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.