प्री स्कूल रजिस्ट्रेशन लिंक झाली सुरू; सात दिवसांची मुदत

तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांनी या पोर्टलवर पुढील सात दिवसांच्या आत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

प्री स्कूल रजिस्ट्रेशन लिंक  झाली सुरू; सात दिवसांची मुदत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पूर्व प्राथमिक शिक्षण (Pre-Primary Education) देणाऱ्या सर्व खाजगी केंद्राची (private center) माहिती एकत्रित स्वरूपात राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर तसेच पालकांनाही उपलब्ध व्हावी म्हणून तीन ते सहा वयोगटातील बालकांना (For children aged three to six) शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्राची नोंदणी करण्यासाठी (Registration Process) प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल (Pre School Registration Portal) शासनाकडून सुरू करण्यात आले आहे. तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांनी या पोर्टलवर पुढील सात दिवसांच्या आत नोंदणी करणे बंधनकारक (Registration is mandatory within the next seven days.) करण्यात आले आहे.  

यामध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांची सर्वसाधारण माहिती व्यवस्थापनाची माहिती विद्यार्थी संख्या भौतिक सुविधा कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती यांची नोंद पोर्टलवर करायची आहे.

हे खाजगी केंद्र प्री स्कूल, नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजी, पूर्व प्राथमिक वर्ग अशा कोणत्याही नावाने सुरू करण्यात येते. पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्राच्या नोंदणीची सुविधा https://education.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर वेब लिंक्समध्ये उपलब्ध असलेल्या Pre-School Registration Portal (ECCE) या टॅबवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

प्री-स्कूल नोंदणीसाठी खाली दिलेल्या पीडीएफमधील स्टेप्स फॉलो करा.  

file:///C:/Users/User1.User/Downloads/Pre-SchoolRegistrationUserManual.pdf