'एमपीएससी'मार्फत गट -अ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू 

या भरती मोहिमेअंतर्गत गट- अ संवर्गातील पदे भरती जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार २ जून पासून आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ mpsc.gov.in वर अर्ज भरू शकतात. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २३ जून २०२५ पर्यंत असणार आहे.

'एमपीएससी'मार्फत गट -अ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) विविध विभागातील रिक्त पदे (Vacancies in various departments) भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध (Advertisement published) करण्यात आली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत गट- अ संवर्गातील पदे भरती जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार २ जून पासून आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ mpsc.gov.in वर अर्ज भरू शकतात. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २३ जून २०२५ (Application deadline June 23) पर्यंत असणार आहे.

या भरती मोहिमेअंतर्गत औद्योगिक सुरक्षा व आयोग्य संचालनालयाच्या आस्थापनेवरील उप संचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, गट-अ या संवर्गातील ५ पदे भरली जाणार आहेत. तसेच राज्य सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातील शास्त्रज्ञ, श्रेणी-२, गट-अ या संवर्गातील ६ पदे भरली जाणार आहेत. त्याशिवाय वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागातील सह संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधक, गट-अ आणि दंत महाविद्यालयातील प्राध्यापक गट-अ, या संवर्गातील प्रत्येकी एक-एक पद भरले जाणार आहेत. 

आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये विविध विभागातील पदे असल्याने त्यांची शैक्षणिक, परीक्षा शुल्क आणि वयोमर्यादा यामध्ये भिन्नता आहे. त्यामुळे पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सविस्तर वाचावी. भरती संदर्भातील सविस्तर तपशील देण्यात आलेला आहे.