विद्यापीठात शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘उन्हाळी विज्ञान शिबिरा’चे आयोजन

विद्यापीठातील विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्र नेहमीच शालेय विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने, हसत-खेळत विज्ञान शिकविण्यासाठी विविध कार्यक्रम घेत असते. याचाच भाग म्हणून केंद्रातर्फे या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यापीठात शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘उन्हाळी विज्ञान शिबिरा’चे आयोजन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

लहान मुलांमध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University)शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘उन्हाळी विज्ञान शिबिरा’चे (Summer Science Camp)आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्राद्वारे घेण्यात येणारे हे शिबिर इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खुले असणार आहे. 

विद्यापीठातील विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्र नेहमीच शालेय विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने, हसत-खेळत विज्ञान शिकविण्यासाठी विविध कार्यक्रम घेत असते. याचाच भाग म्हणून केंद्रातर्फे या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या २२ मे ते ४ जून दरम्यान ही शिबिरे विद्यापीठात घेण्यात येणार आहेत. या शिबिरात खेळण्यांच्या माध्यमातून वैज्ञानिक शिक्षण, टाकाऊतून टिकाऊ, जीवाश्माशी संवाद आणि पाषाण आमुचे सांगाती, सूक्ष्मदर्शिका, निसर्गशाळा, विलक्षण चुंबकत्व, प्रकाश आणि रंग, मजेशीर रसायनशास्त्र, मेकॅट्रॉन, स्वयंपाकघरातील विज्ञान, जग मधमाश्यांचे अशा विविध विषयावर तज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच प्रात्याक्षिकांच्या माध्यमातून विविध संकल्पना मांडणार आहेत. या बरोबरच काही शिबिरांमधे विद्यार्थांना  स्वतः वस्तु तयार करून घरी नेता येणार आहेत. हे शिबिर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत होणार आहे.

या एकदिवसीय शिबिरांचे शुल्क विषयानुरूप ६०० ते १२०० रूपये असून लवकरच यांच्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी  http://www.unipune.ac.in/  , http://sciencepark.unipune.ac.in/ या वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा अबोली - ९५५२६५६९२४, आयेशा - ९८६०१६१८५४ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.