मुक्त विद्यापीठाच्या वार्षिक सत्र लेखी परीक्षा उद्यापासून सुरू 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या  विविध विद्याशाखांतील १२१ अभ्यासक्रमाच्या हिवाळी परीक्षा ७ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. मात्र, राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विद्यापीठातील अनेक कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत गुंतले आहेत.

मुक्त विद्यापीठाच्या वार्षिक सत्र लेखी परीक्षा उद्यापासून सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) २०२५-२६ मध्ये प्रवेश घेतलेल्या नियमित विद्यार्थ्यांच्या सत्र, वार्षिक परीक्षा तसेच मे २०२५ च्या सत्र परीक्षेत (May 2025 semester examinations) अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचीही लेखी परीक्षा (Written examination for students retaking the exam) उद्या ७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. यासाठी राज्यातील २६९ परीक्षा केंद्रांवर होणार आहे. परीक्षेसाठी १ लाख ४९ हजार ८७२ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत.

हेही वाचा - मोठा निर्णय! अग्नीवीरांना परमानंट होयचे असेल तर, लग्न करता येणार नाही..

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या  विविध विद्याशाखांतील १२१ अभ्यासक्रमाच्या हिवाळी परीक्षा ७ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. मात्र, राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विद्यापीठातील अनेक कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत गुंतले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना देखील मतदान प्रक्रिया पार पाडायची आहे. या सर्व गोष्टींची विचार करता विद्यापाठाने १४ ते १६ दरम्यान होणाऱ्या परीक्षांचे पेपर पुढे ढकलले आहेत. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरदार, व्यावसायिक, पोलीस, सैनिक, गृहिणी, शिक्षक, कामगार अशा समाजातील विविध घटकांतील असून या परीक्षेमध्ये विविध विषयाच्या ६ लाख ७९ हजार ९५४ उत्तरपत्रिका लिहिल्या जाणार आहेत. परीक्षा सुरळीत व पारदर्शकपणे होण्यासाठी विद्यापीठाने भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वर्ग 'क' परीक्षा रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी होणार असून तसेच महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यामुळे १४ ते १६ जानेवारी २०२६ रोजी नियोजित असलेल्या विद्यापीठाच्या परीक्षांचे आयोजन पुढे ढकलले आहे.