रेल्वेत पॅरामेडिकलच्या 1 हजार 376 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध.. 

इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 17 ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज मागण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 16 सप्टेंबर 2024 आहे. 

रेल्वेत पॅरामेडिकलच्या  1 हजार 376 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारतीय रेल्वे मंडळाकडून (RRB) पॅरामेडिकल स्टाफ भरती (Paramedical Staff Recruitment) प्रक्रियेसाठी 5 ऑगस्ट 2024 रोजी अधिसूचना प्रसिद्ध (Notification released) करण्यात आली आहे. या भरतीद्वारे 1 हजार 376 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 17 ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज (Online application starts from 17th August) मागण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 16 सप्टेंबर (Deadline to apply is September 16) 2024 आहे. 

RRB अंतर्गत, आहारतज्ज्ञ - 5, नर्सिंग अधीक्षक - 713, ऑडिओलॉजिस्ट - 4, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ - 7, दंत आरोग्यतज्ज्ञ - 3, डायलिसिस तंत्रज्ञ - 20, आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक Gr III - 126, प्रयोगशाळा अधीक्षक Gr III - 27, परफ्युजनिस्ट - 2, फिजिओथेरपिस्ट ग्रेड II - 20, व्यावसायिक थेरपिस्ट - 2, कॅथ लॅब तंत्रज्ञ - 2, फार्मासिस्ट (प्रवेश श्रेणी) - 246, रेडिओग्राफर एक्स-रे तंत्रज्ञ - 46, स्पीच थेरपिस्ट - 1, कार्डियाक टेक्निशियन - 4, ऑप्टोमेट्रिस्ट - 4, ईसीजी, तंत्रज्ञ - 13, लॅब असिस्टंट ग्रेड II - 94, फील्ड वर्कर - 19 अशा विविध पदांच्या एकूण 1 हजार 176  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 

यासाठी सामान्य/ओबीसी उमेदवारांना 500 रूपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे. तर एसी/एटी उमेदवारांना 250 रुपये अर्ज शुल्क आहे. वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता याशिवाय अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मुळ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली अधिसूचना वाचावी. 

ऑनलाइन अर्ज कसा करावा

प्रथम अधिकृत रेल्वे भर्ती बोर्डाच्या वेबसाइटला भेट द्या. 'रेल्वे पॅरामेडिकल रिक्रूटमेंट 2024' वर क्लिक करा. त्यानंतर ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय तुमच्यासमोर असेल, त्यावर त्यावर क्लिक करून मूलभूत आणि शैक्षणिक पात्रता तपशील योग्यरित्या प्रविष्ट करा. छायाचित्रांसह कागदपत्रे अपलोड करा आणि आवश्यक आकारात साइन इन करा. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI वापरून आवश्यक रक्कम भरा. फॉर्मची प्रिंट काढा.