NIFT Admission: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी प्रवेश प्रक्रिया सुरू

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी UG, PG आणि PhD प्रोग्राम्समध्ये प्रवेशासाठी NIFT प्रवेश परीक्षा आयोजित करण्याचे काम नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडे सोपवले आहे.

NIFT Admission: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी प्रवेश प्रक्रिया सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency -NTA ) ने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (National Institute of Fashion Technology) NIFT मध्ये प्रवेशासाठी अंडरग्रॅज्युएट (UG), पदव्युत्तर (PG) आणि पीएचडी प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे (The online application process for entrance exams has started) .  

विलंब शुल्क न भरता अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी असून अर्ज सुधारणा विंडो 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2025 पर्यंत उपलब्ध असेल.  ज्यामुळे उमेदवारांना त्यांच्या सबमिट केलेल्या फॉर्ममध्ये आवश्यक दुरुस्ती  करता येईल. अधिकृत सूचनेनुसार, "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी UG, PG आणि PhD प्रोग्राम्समध्ये प्रवेशासाठी NIFT प्रवेश परीक्षा आयोजित करण्याचे काम नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडे सोपवले आहे."


महत्वाच्या तारखा 
* 22 नोव्हेंबर 2024 ते 6 जानेवारी 2025 या कालावधीत ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज सादर करणे
* विलंब शुल्कासह अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  7 जानेवारी 2025 ते 9 जानेवारी 2025
* 10 जानेवारी 2025 ते 12 जानेवारी 2025 पर्यंत अर्जाच्या तपशिलांमध्ये सुधारणा
* परीक्षेचे वेळापत्रक  9 फेब्रुवारी रोजी जाहीर होईल. 

अर्ज कसा करायचा
* उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी 
* आता मुख्यपृष्ठावर, नोंदणी लिंकवर क्लिक करा.
* स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ दिसेल.
* आता स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज भरण्यासाठी पुढे जा.
* यानंतर अर्ज शुल्क  भरा आणि सबमिट वर क्लिक करा. अर्जाची प्रिंटआउट घ्या.