मंत्री चंद्रकांत पाटलांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत घेतला अभ्यासक्रमाचा आढावा

या फेस्टिव्हलमध्ये वैज्ञानिक प्रयोगांसह विविध उपक्रम सादर होणार असून विज्ञान क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे पुण्यातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, संशोधन संस्थांमधील विद्यार्थी, तरुण, पालक, संशोधक, व्यावसायिकांना विज्ञानाविषयी अधिक जाणून घेण्याची संधी मिळणर आहे.

मंत्री चंद्रकांत पाटलांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत घेतला अभ्यासक्रमाचा आढावा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

फाउंडेशन फॉर ॲडव्हान्सिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी (Foundation for Advancing Science and Technology) (फास्ट इंडिया) तर्फे ११ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी फर्ग्युसन महाविद्यालयात (Ferguson College) इंडिया सायन्स फेस्टिव्हल (India Science Festival) आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांच्या हस्ते झाले. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी (students) संवाद साधत त्यांच्या अभ्यासक्रमाची माहिती घेतली. यावेळी युवराज गुप्ता या विद्यार्थ्यांने त्यांना वर्षभरात झालेल्या शिक्षणाची माहिती दिली.‌

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शिक्षणासोबतच प्रशिक्षणही अत्यंत महत्त्वाचे असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी फास्ट इंडियाचे सह-संस्थापक वरुण अग्रवाल, माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजय राघवन, फास्ट इंडियाचे सीईओ शील कपूर, चेअरमन डेक्कन एज्युकेशनचे प्रमोद रावत आदी उपस्थित होते.

या फेस्टिव्हलमध्ये वैज्ञानिक प्रयोगांसह विविध उपक्रम सादर होणार असून विज्ञान क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे पुण्यातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, संशोधन संस्थांमधील विद्यार्थी, तरुण, पालक, संशोधक, व्यावसायिकांना विज्ञानाविषयी अधिक जाणून घेण्याची संधी मिळणर आहे.  

दरम्यान, या महोत्सवात लोणावळा मधील कल्पना चावला स्पेस ॲकेडमीचे विद्यार्थी देखील सहभागी झाले आहेत. या ॲकेडमीमध्ये देशभरातून २५ विद्यार्थ्यांचीच निवड झाली असून या विद्यार्थ्यांना अंतराळ क्षेत्रात सुरु असलेल्या संशोधनाचे शिक्षण दिले जाते.