कृषी विद्यापीठात विविध पदांची मोठी भरती सुरू 

राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये ५० टक्क्यांची प्रकल्पग्रस्तांमधून पदभरती करण्यास राज्य शासनाने नुकतीच मंजूरी दिली आहे. त्यानंतर आता मागील काही वर्षापासून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात रिक्त असलेले गट ड संवर्गातील ५२९ पदे भरली जाणार आहेत.

कृषी विद्यापीठात विविध पदांची मोठी भरती सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये ५० टक्क्यांची प्रकल्पग्रस्तांमधून पदभरती (50 percent project-affected recruitment) करण्यास राज्य शासनाने नुकतीच मंजूरी दिली आहे. त्यानंतर आता मागील काही वर्षापासून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात (Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University) रिक्त असलेले गट ड संवर्गातील ५२९ पदे भरली जाणार (529 posts in Group D cadre to be filled) आहेत. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.  यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १० एप्रिलपर्यंत देण्यात आली आहे.  

राज्यातील कृषी विद्यापीठातील गट-ड संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी ५० टक्के रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठातील बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे ज्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित केलेल्या आहेत, त्या प्रकल्पबाधित कुटुंबामधुन प्रकल्पग्रस्तांचा सरळसेवेचा अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 

यामध्ये प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, चौकीदार, माळी, व्हाॅलमन, मत्स्य सहायक व मजुर संवर्गाची एकूण ५२९ रिक्त पदे सरळसेवेने भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक चालू झाली असून त्याची अंतिम मुदत १० एप्रिलपर्यंत देण्यात आली आहे. 

प्रयोगशाळा परिचर ३९ पदे असून त्यासाठी १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. परिचर ८० पदे तर माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण असावे. चौकीदार ५० पदे त्यासाठी ७ वी उत्तीर्ण असावे. ग्रंथालय परिचर ५ पदे, शिक्षण १० वी पास, माळी ८ पदे, शिक्षण कृषि विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा एक वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे. मजुर ३४४ पदे, शिक्षण ४ थी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय अन्य काही पदे भरती जाणार आहे. 

या भरती मोहिमेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार. तर मागस प्रवर्ग/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणा आहे.