NTA कडून CUET UG 2024 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

CUET UG 2024 ची डेटशीट प्रसिद्ध झाली आहे. ही परीक्षा 15 ते 24 मे या कालावधीत होणार आहे. एकूण 63 विषयांसाठी परीक्षा होणार आहे.

NTA कडून CUET UG 2024 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने CUET UG 2024 चे वेळापत्रक  प्रसिद्ध (Schedule released) केली आहे. 15 ते 18 मे या कालावधीत सर्व प्रमुख 15 विषयांची परीक्षा केवळ पेन-पेपरवर आधारित असेल. 21 ते 24 मे दरम्यान इतर विषयांची परीक्षा संगणकावर आधारित असेल. एका दिवसात एकूण चार पेपर असतील. CUET UG 2024 साठी एकूण 13.48 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यासाठी भारतातील 380 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 शहरांमध्ये परीक्षा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

NTA महासंचालक सुबोध कुमार सिंह यांनी सांगितले की, " CUET UG 2024 ची डेटशीट प्रसिद्ध झाली आहे. ही परीक्षा 15 ते 24 मे या कालावधीत होणार आहे. एकूण 63 विषयांसाठी परीक्षा होणार आहे. यामध्ये सर्वसाधारण विषयांच्या पेपरसाठी 45 मिनिटांचा वेळ असेल. उमेदवारांना इकॉनॉमिक्स, फिजिक्स, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, अप्लाइड मॅथेमॅटिक्स आणि जनरल टेस्ट या विषयांचे पेपर सोडवण्यासाठी 60 मिनिटे मिळतील.

रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी आणि सामान्य चाचणी परीक्षा 15 मे रोजी होणार आहेत. अर्थशास्त्र, हिंदी, भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांच्या परीक्षा 16 मे रोजी होणार असून भूगोल, शारीरिक शिक्षण, व्यवसाय अभ्यास आणि लेखाशास्त्राच्या परीक्षा 17 मे रोजी होणार आहेत. याशिवाय 18 मे रोजी इतिहास, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांची परीक्षा होणार आहे. या सर्व परीक्षा पेन-पेपरवर म्हणजेच हायब्रीड मोड वर आधारित असतील.

21 मे रोजी भाषा, ललित कला, संस्कृत, फॅशन स्टडीज आणि मानसशास्त्र या विषयांच्या परीक्षा होणार आहेत. तर 22 मे रोजी संगणकशास्त्र, माहितीविषयक सराव, गृहविज्ञान, संस्कृत, अध्यापन अभियोग्यता, कायदेशीर अभ्यास आदी विषयांची परीक्षा होणार आहे, तर 24 मे रोजी भाषा, पर्यटन, पर्यावरण अभ्यास, परफॉर्मिंग आर्ट्स आदी विषयांची परीक्षा होणार आहे.