CMAT 2024 ची नोंदणी सुरू; मे मध्ये परीक्षा, 'ही' अंतिम तारीख  

इच्छूक उमेदवार exams.nta.ac.in/CMAT या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची अंतिम मुदत १८ एप्रिल आहे.

CMAT 2024 ची नोंदणी सुरू; मे मध्ये परीक्षा, 'ही' अंतिम तारीख  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट (CMAT) साठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छूक उमेदवार exams.nta.ac.in/CMAT या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज (Online application) करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत १८ एप्रिल रोजी रात्री ९ः५० वाजेपर्यंत असणार आहे. तर फी भरण्याची मुदत रात्री ११ः५० पर्यंत देण्यात आली आहे. 

कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट परीक्षा मे महिन्यात घेतली जाणार आहे. प्रश्नपत्रिकेत परिमाणात्मक तंत्र, तार्किक तर्क, भाषा आकलन आणि सामान्य जागरूकता यातील प्रश्नांचा समावेश असेल. परीक्षेचा कालावधी 180 मिनिटांचा असणार आहे. 

असा करा नोंदणी अर्ज

सर्वप्रथम CMAT च्या अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/CMAT वर जा. नोंदणीसाठी लिंकवर क्लिक करा. पुढील विंडोवर, नवीन नोंदणी वर क्लिक करा. निर्देशानुसार नाव, पत्ता आणि शैक्षणिक पात्रता यासह वैयक्तिक तपशील भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. परीक्षा फी भरुन अर्ज सबमिट करा.

NTA च्या निवेदनात म्हटले आहे, "कोणत्याही शंका किंवा/स्पष्टीकरणासाठी, उमेदवार NTA हेल्प डेस्क 011 40759000 वर कॉल करू शकतात किंवा NTA चे संकेतस्थळ cmat@nta.ac.in यावर अधिक माहिती मिळवू शकतात.