CTET दुरुस्ती विन्डो 12 एप्रिलपर्यंत खुली

अर्जाची विंडो फक्त 12 एप्रिलपर्यंतच खुली राहील.

CTET दुरुस्ती विन्डो 12 एप्रिलपर्यंत खुली

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET) जुलै 2024 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ज्या उमेदवारांकडून अर्ज भरताना काही त्रुटी राहिल्या असतील अशा उमेदवारांसाठी CBSE ने दुरुस्ती विंडो उघडली आहे. उमेदवार CTET 2024, ctet.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्जात तत्काळ सुधारणा करू शकतात. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की अर्जाची विंडो फक्त 12 एप्रिलपर्यंतच खुली राहील, त्यानंतर उमेदवार फॉर्ममध्ये कोणतेही बदल करू शकणार नाही.

असा करता येईल अर्ज दुरुस्त

* CBSE CTET जुलै 2024 च्या अर्जात बदल करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट ctet.nic.in ला भेट द्या.

* वेबसाइटच्या होम पेजवर दुरूस्ती विंडो: CTET जुलै-2024 या लिंकवर क्लिक करा.

* आता अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

* यानंतर उमेदवारांनी विहित सुधारणा कराव्यात.

* यानंतर, शेवटी सुधारित फॉर्मची प्रिंटआउट घ्या.