विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्य आत्मसात करावी :डॉ.पराग काळकर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागामध्ये एम.ए. हिंदी विषयात प्रवेश घेऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी इंडक्शन कार्यक्रमात डॉ.पराग काळकर बोलत होते.

विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्य आत्मसात करावी :डॉ.पराग काळकर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भाषिक कौशल्यातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. त्यामुळे वाङमय क्षेत्रात कार्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्य आत्मसात केले पाहिजेत.तसेच  समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी रचनात्मक भाषा, वाङमय कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे आवश्यक आहे,असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर (Dr.Parag Kalkar, Pro Vice-Chancellor of Savitribai Phule Pune University) यांनी व्यक्त केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागामध्ये एम.ए. हिंदी विषयात प्रवेश घेऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी इंडक्शन कार्यक्रमात डॉ.पराग काळकर बोलत होते. कार्यक्रमास हिंदी विभाग प्रमुख डॉ. सदानंद भोसले, डॉ. राजेंद्र घोडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक टीकम शेखावत यांनी "साहित्यिक, पत्रकारिता आणि भाषिक कौशल्य" या विषयावर मार्गदर्शन केले. तर डॉ. ओमप्रकाश शर्मा यांनी "हिंदी भाषेत रोजगाराचे विविध क्षेत्र" या विषयावर मार्गदर्शन केले. श्रीदत्त गायकवाड आणि महेश जगताप यांनी "कम्युनिटी रेडिओ तंत्र आणि उपयोगिता" या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजीत कुलकर्णी यांनी "शोध प्रक्रिया आणि प्लेग्रिझम" या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ.सदानंद भोसले यांनी प्रास्ताविक तर डॉ. राजेंद्र घोडे यांनी आभार प्रदर्शन केले.